Maratha Reservation : जरांगेंच्या आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'इतिहासात कुणीच केले नाही, ते मी अन् शिंदेंनी...'

Maharashtra Politics News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संदर्भातील विविध मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे.
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संदर्भातील विविध मागण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली असून, मराठा समाजासाठी सरकारने केलेल्या कामांचा त्यांनी पाढा वाचला आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले, "सरकारने 'सारथी' सारखी संस्था तयार केल्यामुळे आज अनेक मराठा तरुण आय.ए.एस, आय. पी. एस, आणि एम.पी.एस.सी स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन करत आहेत. तसेच 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मराठा समाजातले उद्योजक आपण तयार केले आहेत."

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा हिशेब: सरकारने काय दिलं, समाजाला अजून काय हवं?

शिक्षणाच्या क्षेत्राबाबत बोलताना ते म्हणाले की, "शिक्षण क्षेत्रातील सर्व स्कॉलरशिप उत्तम प्रकारे चाललेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही, त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवत आहोत. तसेच नवीन हॉस्टेल्स देखील तयार केली जात असून, कुठलीही योजना बंद करण्यात आलेली नाही."

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा हिशेब: सरकारने काय दिलं, समाजाला अजून काय हवं?

प्रमाणपत्रे आणि व्हॅलिडिटी प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार समाजातील तरुणांकडून मागण्यात आलेली खूप प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत, अशी परिस्थिती नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जे प्रमाणपत्र मागितले जातात, त्यातील नियमात बसणारे सगळे दिले जात आहेत.

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange: न्याय मिळेपर्यंत हटणार नाही! जरांगेंची पुन्हा आंदोलनाची हाक; तारीख केली जाहीर

प्रमाणपत्रांच्या व्हॅलिडिटी प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, "ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते. त्याची कमिटी आणि निकष देखील सर्वोच्च न्यायालयानेच तयार केले आहेत. त्या समितीला सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण स्वायत्तता दिली असून, राज्य सरकार त्यात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे कमिटी नियमानुसारच व्हॅलिडिटी करत आहे."

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange News: मनोज जरांगे पुन्हा मराठा समाजाची मोट बांधणार, मुंबईत झालेली 'ती' चूक सुधारणार? आंदोलनामुळे होणार 4 मोठे परिणाम

हैदराबाद गॅझेटबाबत माहिती देताना फडणवीस म्हणाले, "हैदराबाद गॅझेटला मंजुरी दिल्यानंतर त्याची केस आता उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे, अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे कोर्टाचा अवमान कुठेही होऊ नये या दृष्टीने आम्हला विधी व न्याय विभागानी काही सल्ला दिलेला आहे, त्यानुसारच आम्ही काम करत आहोत."

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
मराठा आरक्षणानंतर भाजपने फडणवीसांना "शिल्पकार" ठरवले; दरेकरही म्हणाले, "देवा भाऊ बाहुबली, एकही मारा जोर से मारा"

इतिहासात कोणत्याही सरकारने केले नाही एवढे काम आम्ही केले!

आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री म्हणाले, 'कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केलेल्या नाहीत किंवा बंदही केलेल्या नाहीत. उलट अधिक ताकदीने आम्ही त्या चालवत आहोत. जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी काम केले, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारच्या काळात ते झालेले आहे. मात्र, लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबू शकत नाही," अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली.

Manoj Jarange Patil CM Devendra Fadnavis
Manoj Jarange News: मनोज जरांगे पुन्हा मराठा समाजाची मोट बांधणार, मुंबईत झालेली 'ती' चूक सुधारणार? आंदोलनामुळे होणार 4 मोठे परिणाम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com