Manoj Jarange: न्याय मिळेपर्यंत हटणार नाही! जरांगेंची पुन्हा आंदोलनाची हाक; तारीख केली जाहीर

Manoj Jarange Warns CM Devendra Fadnavis : मराठा-कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले असून सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. फडणवीसांवरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSatrkarnama
Published on
Updated on

Maratha Protest Maharashtra: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत पुन्हा आंदोलनांचे हत्यार उपसलं आहे. “न्याय मिळेपर्यंत आता हटणार नाही,” असा इशारा देत जरांगेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केले आहे. मराठा-कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रोखली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

आज सकाळी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा काय असेल यावर चर्चा झाली. सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये, असा इशाराही जरांगेंनी दिला आहे.

बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर ३० मे रोजी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.

“मराठा-कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करत आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार पात्र असलेल्या मराठा बांधवांनाही प्रमाणपत्र दिले जात नाही. सरकारकडूनच दबाव टाकला जात असल्याचे अधिकारी सांगतात. याला सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत,” असा आरोप जरांगेंनी केला.

Manoj Jarange Patil
PCMC NEWS: आमचं नगरसेवक पद घालवतो का? थांब गोळ्याच घालतो...पिंपरी चिंचवडमध्ये ओबीसी कार्यकर्त्याला धमकी

“मुख्यमंत्रीच राज्यातील सर्वेसर्वा असतो, असे स्वतः फडणवीस यांनी सांगितले होते. मग आता मराठा समाजाला न्याय का दिला जात नाही? मराठ्यांच्या लेकरांचे आयुष्य अडवण्याचे काम सरकार करत आहे,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

Manoj Jarange Patil
MahaTET 2026: महाटीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! NEET मुळे MahaTET परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाहीर

आंदोलनाची तारीख जाहीर करण्यापूर्वी सर्व पात्र मराठा बांधवांना तातडीने प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी करताना जरांगेंनी सरकारला थेट इशारा दिला. “मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आंदोलन एवढं तीव्र होईल की मुख्यमंत्री फडणवीस यांना चारही दिशांना मराठेच दिसतील,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.

Manoj Jarange Patil
Pune Crime Firing News: हा फक्त ट्रेलर… पुढची गोळी डोक्यात.. पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ; मॉलवर गोळीबार

यावेळी त्यांनी १९९४ प्रमाणेच सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे संस्थानच्या गॅझेटीएडचा जीआर काढण्याची मागणीही केली. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर पुन्हा मोठं मराठा आंदोलन उभं राहील, असा निर्धार मराठा समाजातून व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com