Manoj Jarange News: मनोज जरांगे पुन्हा मराठा समाजाची मोट बांधणार, मुंबईत झालेली 'ती' चूक सुधारणार? आंदोलनामुळे होणार 4 मोठे परिणाम

Maratha Reservation News: मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनाच्या घोषणेमुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी सरकारला मराठा समाजाचा एवढा द्वेष का? असा उपस्थित केला आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे, असल्याचा घणाघाती आरोपही जरांगेंनी यावेळी केला.
Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil On CM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maratha Resevation News: मराठा आरक्षणासाठी सपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांसह विविध मागण्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकलं आहे. येत्या 30 मे पासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांनी शनिवारी(ता.16) याबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाची एकत्र मोट बांधत आंदोलनाची हाक दिली आहे.जरांगेंनी अंतरवाली सराटी येथे बोलावलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत आंदोलनाची घोषणा केली आहे. पण या आंदोलनाच्या घोषणेमुळे राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. तसेच आगामी काळात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्षही चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनाच्या घोषणेमुळे फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी सरकारला मराठा समाजाचा एवढा द्वेष का? असा उपस्थित केला आहे. राज्यातील फडणवीस सरकारकडून वारंवार मराठा समाजाची फसवणूक केली जात आहे, असल्याचा घणाघाती आरोपही जरांगेंनी यावेळी केला. पण या आंदोलनाची खरंच गरज आहे का, या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रणुख मागण्या पूर्ण होणार का?असा घणाघाती आरोप करत जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या ३० मे पासून आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. तेथील आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचाही दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis
Nashik Politics Crime: आंबेडकरांचा गंभीर आरोप; 'टीसीएस' प्रकरणात भाजपच्या 'स्क्रिप्ट'नुसार पोलिसांचा तपास!

मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाचा शब्दांवर विश्वास ठेवून आणि न्यायालयाच्या सूचनेनुसार उपोषण मागं घेतलं होतं. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनाची मुंबईतील कोंडी फोडणे, आंदोलकांचे संभाव्य नुकसान टाळणे, आणि सरकारला दिलेली नवीन 'डेडलाईन' पाळणे यासाठी त्यांनी घाईगडबडीत हा निर्णय घेतल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. हीच चूक जरांगेंना महागात पडल्याचं सध्यातरी दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांनी सरकारच्या केवळ तोंडी आश्वासनांवर किंवा शासन निर्णयांवर विश्वास ठेवून अनेकदा उपोषण मागे घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुंबईतील आंदोलनांनंतरही मराठा समाजाच्या हाती ठोस काहीच पडले नसल्याची टीका त्यावेळी करण्यात आली होती.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis
CJI Surya Kant: 'झुरळ' टिप्पणीवरुन टीका सुरु झाल्यानं सरन्यायाधिशांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अत्यंत वेदना झाल्या, मी बेरोजगार तरुणांना...

तसेच गेल्या आंदोलनांवेळी आंदोलकांवर दाखल झालेले गंभीर गुन्हेही मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण अजूनही अनेक गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत, त्यामुळे जरांगेंनी घाईगडबडीत आंदोलन मागे घेतल्याची नाराजी आंदोलकांमध्येही व्यक्त होत होती.

आंदोलनाचे होणारे परिणाम:

1) मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 30 मे पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण पुकारलं आहे.या आंदोलनाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि प्रशासनावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आंदोलनामुळे राज्यातील महायुती सरकारसमोरील राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आह

2) तसेच या आंदोलनामुळे मराठा समाजाला 'कुणबी' प्रमाणपत्र देण्याची वाटप करण्याची मंदावलेल्या प्रक्रियेला पुन्हा एकदा गती प्राप्त होऊ शकते. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis
MlC Election : विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर 'स्थानिक'चा बिगुल वाजणार! काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जुन्या गडावर भाजपची 'गनिमी कावा' रणनीती; कोणाची लागणार लॉटरी?

3) अंतरवाली सराटी,मु्ंबईसह आरक्षणासाठी विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे मागे घेण्याची आवश्यकता असून त्यामुळे मराठा बांधवांना विविध त्रासांना समोरे जावे लागले. आंदोलनात मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे अजूनही मागे न घेतल्याने जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलन तीव्र झाल्यास सरकारला हे गुन्हे त्वरित मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

4) मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज पुन्हा एकदा एकत्र येत आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे. यामुळे मराठा समाजाला 'सगेसोयरे' संदर्भातील अधिसूचनेची कठोर अंमलबजावणी आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मुख्य मागणी जोर धरण्याची शक्यता आहे. या निर्णयावर पुन्हा एकदा राजकीय व कायदेशीर दृष्ट्या चर्चा झडण्याची शक्यता आहे.

Manoj Jarange Patil On CM Devendra Fadnavis
Maharashtra Politics: कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, हजारोंची गर्दी, तरी केंद्रीय मंत्र्यांनी चकार शब्दही न काढता गुंडाळला दौरा ; काय घडलं..?

मराठा समाजाच्या मागण्या...?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केेलेल्या बेमुदत आंदोलन पुकारलं आहे. सरकारसमोर जरांगे यांनी काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.

1) मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं तत्काळ वाटप सुरू करण्यात यावं.

2) विनाविलंब प्रमाणपत्रं देण्यात यावीत.

3)सातारा,हैदराबाद गॅझेटचा जीआर तत्काळ लागू करण्यात यावा.

4) उपसमिती बरखास्त करावी.

5) शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात यावी.

6) मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करा.

7). मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे.

8) मराठा समाजासाठी स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करण्यात यावं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com