News Arena India Survey Sarkarnama
मराठवाडा

News Arena India Survey : मराठवाड्यात युती - आघाडीत होणार 'काँटे की टक्कर'; नव्या सर्व्हेनं धाकधूक वाढली

Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर भाजपला सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Marathwada : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. याचवेळी वेगवेगळ्या संस्थांचे सर्व्हे देखील समोर येत आहेत. आता न्यूज एरेना इंडिया या संस्थेनं केलेल्या सर्व्हेत धक्कादायक अंदाज पुढे आले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा भाजप शिवसेनेचंच सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा करतानाच त्यांनी मराठवाड्यात युती आणि आघाडीत काँटॅ की टक्कर होण्याची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर भारतीय जनता पक्षाला सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज ‘न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना मिळाली असून राज्यातील तब्बल ३५ टक्के लोकांनी फडणवीस यांना कौल दिला आहे. याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या त्यांच्या जागेत वाढ करतील पण त्यांना बहुमताचा आकडा गाठणं शक्य होणार नसल्याचं म्हटलं आहे.

राज्यात विधानसभेच्या २८८ जागांपैकी केलेल्या सर्व्हेत भाजप(BJP)ला सर्वाधिक १२३ ते १२९ तर शिंदे गटाला २५ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणं अपेक्षित आहे. ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.(News Arena India Survey)

मराठवाड्यात युती आघाडीत काँटे की टक्कर...

‘न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मराठवाड्या(Marathwada) त ४६ जागांपैकी भाजपला १९ जागा, शिवसेना (शिंदे गट) ५, ठाकरे गट २, काँग्रेस १०, राष्ट्रवादी ९ आणि इतर एक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

'बीड' जिल्ह्यात कोणाला किती जागा मिळणार ?

गेवराई - राष्ट्रवादी

माजलगाव- भाजप

बीड- राष्ट्रवादी

आष्ट्री- भाजप

केज - भाजप

परळी -राष्ट्रवादी

'लातूर'मध्ये कोणाला किती जागा मिळणार ?

लातूर ग्रामीण - काँग्रेस

लातूर शहर - काँग्रेस

अहमदपूर- भाजप

उदगीर - भाजप निलंगा भाजप

औसा- काँग्रेस

'धाराशिव'मध्ये समसमान जागा...

उमरगा - शिंदे गट

तुळजापूर - भाजप

उस्मानाबाद - ठाकरे गट

परंडा - राष्ट्रवादी

'छत्रपती संभाजीनगर'मध्ये जिल्ह्यात काय होणार ?

सिल्लोड - शिंदे गट

कन्नड- बीआरएस

फुलांब्री - भाजप

छत्रपती संभाजीनगर सेंट्रल - राष्ट्रवादी

छत्रपती संभाजीनगर पूर्व - शिंदे गट

छत्रपती संभाजीनगर पश्चिम - भाजप

पैठण - ठाकरे गट

गंगापूर - भाजप

वैजापूर - शिंदे गट

जालन्यात भाजपला अधिक जागा..

परतूर - भाजप

घनसांवंगी- राष्ट्रवादी

जालना- काँग्रेस

बदनापूर - भाजप

भोकरदन - भाजप

परभणीत राष्ट्रवादीला कौल

जिंतूर- राष्ट्रवादी

परभणी- शिदे गट

गंगाखेड- राष्ट्रवादी

पाथरी- काँग्रेस

हिंगोलीत कुणाला किती जागा ?

वसमत - भाजप

कळमनुरी - काँग्रेस

हिंगोली - भाजप

नांदेड

किंवत - राष्ट्रवादी

हडगाव - काँग्रेस

भोकर - काँग्रेस

नांदेड उत्तर - काँग्रेस

नांदेड दक्षिण- भाजप

लोहा- भाजप

नायगाव -भाजप

देगलूर - काँग्रेस

मुखेड - भाजप

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT