Mla Kailas Patil News : ठाकरे सरकारने मंजुरी दिलेल्या क्रीडा संकुलाची जमीन, शिंदे सरकारने परत घेतली..

Marathwada : क्रिडा संकुल होण्यासाठी अडचणी आणून सरकारला काय साध्य करायचे आहे?
Mla Kailas Patil  News, Dharashiv
Mla Kailas Patil News, Dharashiv Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशीव तालुका क्रीडा संकुलाला मंजुरी दिली होती. यासाठी १९ हजार चौरस मीटर जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. (Mla Kailas Patil News) मात्र राज्यातील सत्तांतरानंतर नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने या क्रिडा संकुलाच्या जागेच्या हस्तांतरणाला स्थगिती दिली आहे.

Mla Kailas Patil  News, Dharashiv
Dharashiv Loksabha News : भाजप राणा पाटीलांनाच लोकसभेच्या आखाड्यात उतरवणार ?

शिंदेंच्या बंडातून आमदार कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) बाहेर पडल्याचा राग सरकारने त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले क्रिडा संकुल स्थगित करून तर काढला नाही ना? अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. (Osmanabad) धाराशिव तालुका क्रिडा संकुलासाठी दिलेल्या जागेवर शासनाने स्थिगिती दिली असल्याने स्थलांतराची प्रक्रिया आता लांबणीवर पडणार आहे.

औद्योगिक क्षेत्रावरील दोन टप्प्यामध्ये १९ हजार चौरस मीटर जागा मंजुर करण्यात आली होती. त्यावर स्थगिती आणल्याने क्रिडाप्रेमीकडून नाराजी व्यक्त होत आहे. (Shivsena) याबाबत आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे.

धाराशिव येथे असलेले क्रिडा संकुल अपुरे पडत असल्याने तालुका क्रिडा संकुलाच्या माध्यमातुनअधिक सुसज्ज व सर्वसोयी सुविधा असलेले नवीन संकुल उभे करण्यासाठी महाविकास आघाडीच्या काळात पाऊले उचलली गेली होती. त्यात कैलास पाटील यांनी पुढाकार घेऊन क्रिडा संकुलासाठी लागणारी जमीन देखील मंजुर करुन घेतली होती. या नव्या संकुलाचा खेळाडु व इतर नागरीकांना चांगला उपयोग होणार होता.

एक नवीन संकुल उभे रहावे, शहरात स्विमींग तसेच व्यायाम शाळेची गरज असतांना या स्थगिती आदेशान पहिल्याच घासाला खडा लागल्याची चर्चा सूरु झाली आहे. धाराशिव येथील औद्योगिक क्षेत्रावरील जागेमध्ये हे संकुल उभा राहवे यासाठी १९ हजार चौरस मीटर जागा नाममात्र दराने धाराशिव जिल्हा क्रिडा अधिकारी यांना वाटप करण्यास ठारावद्वारे मंजुरी देण्यात आली होती. मात्र मार्चमध्ये झालेल्या विभागाच्या बैठकीत त्याला स्थगिती देण्यात आली आहे.

Mla Kailas Patil  News, Dharashiv
Abdul Sattar On Balasaheb Thackeray : सत्तारांचे बाळासाहेब प्रेम, सोयगांवमध्येही उभारणार स्मारक..

त्यामुळे जागा हस्तांतरणाची प्रक्रिया थांबली असून अनेक वर्षापासूनची नागरीकांची, खेळाडुंची नवीन क्रिडा संकुलाची मागणी रखडणार आहे. खेळाडु, क्रिडाप्रेमी व नागरीकांची अनेक वर्षाची क्रिडा संकुलाची मागणी आहे. त्यासाठी जागेची अडचण होती, ती अडचण महाविकास आघाडी सरकारच्या काळात सोडवण्यात आली होती.

मात्र त्यातही नव्या सरकारने खोडा घातला आहे, एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन ही स्थगिती उठविण्याची मागणी केली आहे. क्रिडा संकुल होण्यासाठी अडचणी आणून सरकारला काय साध्य करायचे आहे? असा सवाल आमदार पाटील यांनी उपस्थितीत केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com