Marathwada News : मराठवाड्यासह राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, आपले मुख्यमंत्री ऑक्टोबरनंतर पंचनामे करणार, असे सांगत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना ऑक्टोबरचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांनी पंचांग पाहून काढला का? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. तुम्ही पंचांग पाहून पंचनामे, मदत करणार असलात तरी शेतकरी मुहूर्त पाहून आत्महत्या करत नाही, असा संतापही ठाकरे यांनी व्यक्त केला.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा' या जनआंदोलनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. गेल्या अनेक वर्षात मराठवाड्याच्या विकासाच्या केवळ घोषणा करण्यात आल्या.
७८० योजनांचे दहा वर्षात केवळ दीड टक्का काम झाले, असा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्यात आले. आज छत्रपती संभाजीनगर येथील धरणे आंदोलनात उद्धव ठाकरे स्वत: सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचा संदर्भ देत त्यांनी टीका केली.
आम्ही सगळी कामे पंचांग आणि मुहूर्त पाहून करतो, त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये पंचनामे करण्याचा मूहूर्त काढला का? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची टिंगल उडवली. तुम्ही पंचनामे मुहूर्त पाहून करणार असलात तरी माझा शेतकरी मुहूर्त पाहून आत्महत्या करत नाही. तुम्ही त्याच्या मरणाची वाट पहात आहात का?
दुष्काळात त्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे. पावसाअभावी पीक करपली असताना तुम्ही गावात लोडशेडिंग करता? हा तुमचा कारभार? अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, तिथे दुष्काळा जाहीर करण्यात आला आहे, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले. शिवसेनेने मराठवाड्याच्या विकासासाठी सुरू केलेल्या या जनआंदोलनाचा हा समारोप नाही तर सुरूवात आहे.
तुम्ही एकजूटीने या सरकारच्या विरोधात लढण्याची तयारी ठेवा, यापुढे तुमचे सरकार सत्तेवर येणार नाही हे गावागावातून यांना ठणकावून सांगा, त्याशिवाय हे जागे होणार नाहीत. जातपात, तो मराठा, ओबीसी, धनगर असा कुठलाच भेद न बाळगता मराठवाड्याच्या, राज्याच्या विकासासाठी एकत्र या, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याचे कौतुक केले, तसेच त्यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आमच्या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत, हे सांगणाऱ्या दिल्लीतील नेत्यांना जेन झींनी झुकवले, या सगळ्या लढ्याचे नेतृत्व करणारा अभिजीत दिपके याच संभाजीनगरमधला आहे. त्याने सरकारचा माज उतरवला आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊनच दाखवला. त्यामुळेच मी सर्वात आधी दिपके यांना दिल्लीत जाऊन पाठिंबा दर्शवला होता, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.