Mahayuti Government : 'राज्यातील महायुती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही...': उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा मोठा दावा

Nanded Politics: भाजपामध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठवाड्यात, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी घेऊन का गेले नाही? असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut - Devendra Fadnavis
Sanjay Raut - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : सध्याची देशातील आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता महायुती सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाही. हे सरकार २०२९ पूर्वीच जाईल, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. नांदेड येथील 'मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा' या जनआंदोलनात राऊत सहभागी झाले होते.

भाजपामध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठवाड्यात, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी घेऊन का गेले नाही? असा सवालही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. मराठवाड्याच्या विकासासाठी केवळ घोषणा केल्या म्हणजे विकास झाला असे होत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जनआंदोलनात संजय राऊत यांनी सरकारला घोषणांचा पाऊस नको, विकासकामांचा हिशेब जनतेला द्या, असे खुले आव्हान दिले. विकासाच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या राज्य सरकारला लोक आता जाब विचारत आहेत.

मराठवाड्यासाठी जाहीर केलेल्या योजनांपैकी प्रत्यक्षात किती कामे सुरू झाली, किती निधी खर्च झाला आणि त्याचा लाभ जनतेला किती मिळाला? याचा हिशेब सरकारने द्यावा. सरकारकडून विकासाच्या घोषणा केल्या जातात, मात्र त्या प्रत्यक्षात किती उतरल्या, याचे वास्तव जनतेसमोर मांडले पाहिजे. या जनआंदोलनाचा उद्देशच हा आहे.

Sanjay Raut - Devendra Fadnavis
Pankaja Munde News: जालना जिल्ह्यातील 500 जिल्हा परिषदेच्या शाळांचे भाग्य उजळणार; पालकमंत्री पंकजा मुंडेंनी घेतला महत्त्वाचा निर्णय

मराठवाड्यासाठी ७८० योजनांची घोषणा करण्यात आली असली तरी केवळ घोषणा करणे म्हणजे विकास नव्हे, असा टोला राऊत यांनी लगावला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारने संवाद साधावा. उपोषणाला अनेक दिवस उलटूनही चर्चेचे दरवाजे बंद ठेवणे योग्य नसल्याचे राऊत म्हणाले.

राज्यात ५८ विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. या तपास पथकांमधून आतापर्यंत काय निष्पन्न झाले? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर करावा, अशी मागणी राऊत यांनी केली. सध्याचे सरकार २०२९ पूर्वीच सत्तेतून जाईल, हा दावा नसून राजकीय परिस्थितीचे वास्तव असल्याचे राऊत म्हणाले.

Sanjay Raut - Devendra Fadnavis
Palghar Crime Case: पालघर रुग्णालय कर्मचार्‍यांना मारहाण प्रकरण: शिवसेना 'आमदार पुत्रा'ला निलंबनानंतर आता पोलिसांचा दुसरा मोठा दणका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मराठवाड्यात येऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती पाहावी, असे आवाहनही त्यांनी केले. सरकारी योजना बंद करण्याऐवजी त्या खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचविण्यावर भर द्यावा, असे सांगतानाच या आंदोलनाचा समारोप १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com