Prakash Shendge Chellenge  Sarkarnama
मराठवाडा

Prakash Shendge Challenge : ठाकरेंचे आमदार कैलास पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'... ; OBC नेते शेंडगेंचं 'ओपन चॅलेंज!'

Prakash Shendge Open Chellenge MLA Kailas Patil : तुम्ही एक भुजबळ पाडून दाखवा, 160 मराठा पाडणार..

Shital Waghmare

Dharashiv Politics News : कळंब-धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आंदोलन केले. यामुळे त्यांच्या मतदारसंघातील ओबीसी नेते दुखावल्याची चर्चा होती. याचाच प्रत्यय म्हणजे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आमदार पाटलांना खुला इशारा दिली आहे. 2024 च्या निवडणुकीत कैलास पाटलांना कार्यक्रम करायचा आहे, अशा शब्दात शेंडगे यांनी आव्हान दिले आहे.

धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश शेंडगे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, टी. पी.मुंडे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते. (Latest Marathi News)

यावेळी प्रकाश शेंडगे म्हणाले, "मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायला पाहिजे, म्हणून मंत्रालयाला टाळे मारायला हा पठ्ठ्या (कैलास पाटील) पुढे होता. वाह रे पठ्ठ्या तुला काय फक्त मराठ्यांनी मत दिली? तुला या गरिबांची मते मिळाली नाहीत का? आता 2024 ला ह्यो पठ्ठ्या मत मागायला येणार आहे, तेव्हा याचा कार्यक्रम करायचा आहे, असे त्यांनी सांगितले

"धाराशिव जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ आहेत. तर या धाराशिवमधील चार पैकी तीन मतदारसंघामध्ये आपल्याला तिघांची विकेट काढायची आहे. या तिन्ही ठिकाणी ओबीसी निवडून आणायचे आहेत. एक मात्र मागासवर्गीय आहे, जो बाळासाहेबांचा भक्त असला पाहिजे. त्याला आपण निवडून द्यायचा आहे. नाहीतर चौघांचाही कार्यक्रम करु, सगळे आपलेच असणार आहेत," असेही ते म्हणाले.

"हे ओबीसी आरक्षण आपल्याला वाचवायचा आहे. आतापर्यंत छगन भुजबळ यांच्यासह सगळे ओबीसी नेते महाएल्गार मेळावा घेत होते. परंतु आता आमच्या सोबत या महाराष्ट्राची तिसरी शक्ती जी आहे, ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची शक्ती सोबत आहे. त्यामुळे आरक्षणाचा नाद कोणी करायचा नाही," असेही ते म्हणाले.

जरांगे हे भुजबळांना पाडणार असे म्हणाले होते. भुजबळांना पाडलात तर 160 मराठा पाडल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक जिल्ह्याला सभेत 160 पाडायचा निर्धार केलेला आहे. या सरकारने आपल्या आरक्षणाला धक्का लावलेला आहे. ओबीसींचा विश्वासघात केला आहे. सगळे जण कुणबी झाले तर मराठा समाज नावाला महाराष्ट्र मध्ये राहणार नाही. कुणबीचा दाखलाच मराठ्यांनी घेतला, त्याला पुन्हा मराठा होता येणार नाही. परतीचे दोर कापलेले असतील, हा इशारा मी मराठा समाजाला देत आहे, असेही शेंडगे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT