Beed OBC Elgar Parishdad: गोपीनाथ मुंडे दुर्लक्षित; भुजबळांना ताकद अन् पंकजा मुंडे 'टार्गेट'

Maratha Vs OBC Reservation News : 'मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर जो...'
chagan bhujbal, mahadev jankar, vijay vadettivar, pankaja munde, gopchand padalkar
chagan bhujbal, mahadev jankar, vijay vadettivar, pankaja munde, gopchand padalkarsarkarnama
Published on
Updated on

Beed News : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटलांनी मोठा लढा उभारतानाच पूर्ण ताकद पणाला लावली आहे.याचवेळी दुसरीकडे ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला आहे.ओबीसी समाज आणि भाजपसह महायुती दोघेही दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंशिवाय अपूर्णच. पण, मागच्या दोन दिवसांतील ओबीसींची एल्गार परिषद आणि महायुतीचा मेळावा या दोन प्रमुख गोष्टींतून दिवंगत मुंडे आणि त्यांची दुसरी पिढी पण वेगवेगळ्या मुद्यांनी पुन्हा अधोरेखित झाली.

एल्गार परिषदेतून दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचे नाव घेत सर्वच नेत्यांनी छगन भुजबळांना बळ देत पंकजा मुंडेंना घेरण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला. बळ मिळालेल्या भुजबळांनी देखील अनुपस्थितीच्या मुद्द्यावरुन ‘मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर होता है’ हा शेर म्हणून मुंडेंवर निशाणा साधला.

chagan bhujbal, mahadev jankar, vijay vadettivar, pankaja munde, gopchand padalkar
Uddhav Thackeray : नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड,शिवसेनेचा पुनर्जन्म…; जनता न्यायालयाचा 'मास्ट्रर स्ट्रोक' यशस्वी

रविवारचा दिवस राज्यभर महायुतीच्या जिल्हास्तरीय संमेलनांनी गाजला. युतीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले व ओबीसी घटक पक्षामागे भाजपमागे उभा करुन राज्यभर पक्षाची पाळेमुळे रोवणाऱ्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंची भाजपला आता गरज उरली नसल्याचे दिसले. महायुती आणि विशेषत: भाजपने लोकसभेची तयारी सुरु केली. याचाच पहिला टप्पा म्हणजे महायुतीची जिल्हास्तरीय संमेलने. जिल्ह्यातले संमेलन भाजप कार्यकर्ते व मुंडे समर्थकासाठी थोडी खुशी थोडा गम असे झाले.

कारण, या संमेलनात भाजपसह प्रमुख राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांनी खासदार डॉ. प्रितम मुंडेंच्या (Pritam Munde) लोकसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतानाच त्यांना विक्रमी मतांनी संसदेत पाठविण्याचा निर्धारही करुन टाकला. पण, संमेलनासाठीच्या सर्व जिल्ह्यांसाठी राज्यस्तरावरुन डिझाईन झालेल्या बॅनरवर दिवंगत मुंडेंचे छायाचित्र नाही हे विशेष. युतीच्या शिल्पकारांत मुंडेंचा मोठा वाटा असून भाजपला राज्यात बहुजांना पक्ष अशी ओळखही त्यांनीच करुन दिली. अगदी शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं देखील दिवंगत मुंडेंमुळेच भाजपसोबत आहे. अगदी तळागळापर्यंत भाजप वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे गुणगान आजही राज्यातले व केंद्रातले भाजपनेते भाषणांत म्हणतात. पण, त्यांच्या फोटोची पक्षाला ॲलर्जी का वाटतेय, असा संताप समर्थकांमध्ये आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे स्पर्धक वाटत असल्याने त्यांना प्रवाहापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न असला तरी दिवंगत मुंडेंशिवाय भाजप अपूर्ण आहे हेही तितकेच खरे.दरम्यान,मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व ओबीसी आरक्षणाच्या मागणीचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या उपोषणाची घोषणाच बीड भूमीत झालेल्या अंतिम इशारा सभेतून केली. आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने काही महिन्यांपूर्वी जाळपोळ व दगडफेकीच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या. त्यामुळे येथील ओबीसी एल्गार परिषदेलाही महत्व होते.

राज्याचे नागरी पुरवठा मंत्री या ओबीसी एल्गार परिषदेचे मुख्य असले तरी ही परिषद देखील मुंडेंच्या नावाभोवतीच फिरली. ओबीसी परिषदेच्या अनुषंगाने लावलेल्या बॅनरवर दिवंगत मुंडेंचा फोटो अग्रभागी होता. छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) प्रमुख उपस्थितांमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची नावे व छायाचित्रे सुरुवातीला होती. मेळाव्यात बहुतेक नेत्यांनी दिवंगत मुंडेंचे स्मरण केले आणि समाजासाठीच्या योगदानही विशद केले.

भाजपच्याच गोपीचंद पडळकरांकडून दिवंगत मुंडेंच्या शिकवणीचे आणि कतृत्वाचे गुणगाण गाताना आता ओबीसी आरक्षणात वंजारी व धनगर आरक्षण रथाचे दोन चाक आणि रथावर भुजबळ श्रीकृष्ण, भुजबळांना प्रत्येकाने बळ द्यावे, ओबीसींनी भुजबळांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहण्याचे आव्हान केले.

chagan bhujbal, mahadev jankar, vijay vadettivar, pankaja munde, gopchand padalkar
Naresh Mhaske : अन् 'आदु बाळ' म्हणत नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंना लगावला टोला!

भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) राष्ट्रवादीच्या भुजबळांना बळ द्या म्हणतात म्हणजे हा भाजपमधून पंकजा मुंडेंना घेरण्याचा केला जात असलेला प्रयत्न लपून नाही. अगदी अंबडच्या मेळाव्यात भाजपने पंकजा मुंडे ऐवजी इतर नेत्यांची नावे समाविष्ट केल्यावरच यावर शिक्कामोर्तब झाले होते. आतापर्यंत दिवंगत मुंडेंना पित्यासमान दर्जा देत पंकजांचे मोठे भाऊ म्हणणारे रासपचे महादेव जानकर देखील राजकीयदृष्ट्या पंकजांनाच महत्व देत आहेत. पंकजा मुंडेंसाठी काहीपणची भूमिका भेणारे जानकर या मेळाव्यात भुजबळ मुख्यमंत्री व्हावेत, म्हणत त्यांचे दर्शन घेतात. भुजबळांनीही दिवंगत मुंडेंचा गौरवच केला.

यावेळी जरांगेंवर शाब्दिक तोफहल्ला चढवितानाच अनुपस्थीच्या मुद्द्यावर 'या जिल्ह्यात मोठमोठे लोक आहेत आणि इथे आम्ही छोटे छोटे लोक. काहीतरी बहाणे सांगतली जातात असे म्हणत भुजबळांनी दोन्ही मुंडेंसह (धनंजय व पंकजा) क्षीरसागरांच्या अनुपस्थितीवरुन निशाणा साधाला.

chagan bhujbal, mahadev jankar, vijay vadettivar, pankaja munde, gopchand padalkar
Ajit Pawar : छत्रपती संभाजीनगरच्या पाण्यासाठी अजित पवारांना साकडे; महापालिकेचा हिस्साही सरकार भरणार?

विशेष म्हणजे त्वेषात ‘मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर होता है’ हा शेर देखील भुजबळांनी ऐकविला.पक्षीय भेद सोडून कोठडीतल्या भुजबळांची भेट आणि त्यांच्याबाबत कायम आस्था दाखविण्याचा मनाचा मोठेपणा पंकजा मुंडेंनी दाखविला. पण, त्यांची अनुपस्थिती त्यांची अपरिहार्यता असू शकते याचा विसर भुजबळांना पडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com