MP Omraje NImbalkar-Uddhav Thackearay  Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मराठवाडा दौरा संपवताच ओमराजेंवर दिली मोठी जबाबदारी

Maharashtra politics News : गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. उद्यापासून नगरपालीका, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार दिवस मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मराठवाडा दौरा संपवताच त्यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी जबाबदारी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाने शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह युवासेनेतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही घोषणा आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे धारदार भाषणांमुळे चर्चेत असलेल्या खासदार ओमराजेंवर (Om Rajenimabalkar ) उद्धव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

येत्या दोन महिन्यात राज्यातील पहिल्या टप्प्यात नगरपालिका, नगरपंचायती तर दुसऱ्या टप्प्प्यात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात या शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांवर राज्यातील प्रचाराची जबाबदारी असणार आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या 40 स्टार प्रचारकांच्या या यादीत उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे, सुनील प्रभू, आंदेश बांदेकर, वरूण सरदेसाई, अंबादास दानवे, रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानगुडे पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय (बंडू) जाधव, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, शीतल शेठ देवरूखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, ओमराजे निंबाळकर, सुनील शिंदे, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, अशोक तिवारी, प्रियांका जोशी, सचिन साठे, लक्ष्मण वाडले यांचा समावेश आहे.

यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे. तशी मागणी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आता स्टार प्रचारकांची यादी वाढविण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT