Uddhav Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray Sabha : उद्धव ठाकरेंनी धाराशिवची सभा गाजवली; धडाकेबाज भाषणातील प्रमुख '8' मुद्दे

Dharashiv Loksabha Election 2024 : या सभेनंतर आता माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील धाराशिवची सभा आपल्या धडाकेबाज भाषणाने गाजवली.

Deepak Kulkarni

Dharashiv News : धाराशिव लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. या लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील धाराशिवमध्ये सभा घेतली होती.

या सभेनंतर आता माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील धाराशिवची सभा आपल्या धडाकेबाज भाषणाने गाजवली.टाळ्या,शिट्ट्या, घोषणाबाजी यांनी ही सभा दणाणून सोडली.(Dharashiv Loksabha Constituency)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शनिवारी (ता.4)धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना (ठाकरे गट)उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारसभा घेतली.या सभेत त्यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकेच्या तोफ डागल्या.

यावेळी त्यांनी भाजपचं हिंदुत्व हे गोमूत्रधारी आहे, पण आमचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक असल्याचं पुनरुच्चार केला.तसेच अमित शाह यांनी आम्हांला नकली सेना म्हटलं. पण जे आता आम्हांला नकली सेना म्हणतात, ते बेकली आहे अशी खोचक टीका केली.

ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदीजी ( Narendra Modi) तुम्हांला आमच्यावर प्रेम आलंय,पण मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पुरावा कोण कोणाला देणार हा प्रश्न आहे.मात्र, मोदी काही खरं असेल तर तुमच्या खालच्या माणसांना माहिती नव्हतं काय असा हल्लाबोल केला. तसेच एकीकडे तुम्ही माझी चौकशी करत असताना, आमच्यातले गद्दार आणि फडणवीस हे रात्री गाठीभेटी करत होते. ह्याचे हातपाय हालत नाहीत,तेव्हा ह्याला खाली पाडण्यासाठी कटकारस्थान करत होते. मोदीजी हे तुम्हाला माहिती नाही का,असा संतप्त सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

* 'जय भवानी, जय शिवाजी' या वर निवडणूक आयोगाने घेतलेले आक्षेप मागे घ्यावेत

* ईडी, सीबीआय यांचे घरघडी आहे. मात्र, 4 जूननंतर ते सर्व घरघडी आपल्याकडे येणार आहे.

* मोदीजी, आता आम्ही काय करू तुम्हाला राजकारणात मुलं होत नसेल तर.. म्हणून तुम्हाला दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरावं लागतं आणि त्यांच्यासाठी मतं मागावी लागतात.

* नुसतं बाळासाहेब म्हणू नका. हिंदु हृदयस्रमाट म्हणा, ते म्हणायला जीभ का कचरते?

* हे मोदी सरकार नाही, तर गजनी सरकार आहे.

* मी छातीठोकपणे सांगू शकतो,माझ्या ओमराजेंना मत म्हणजे मला मत.पण तुम्ही प्रज्वल रेवण्णा यांचे अनेक व्हिडीओ झाले तरीही तुम्ही म्हणता मला मत.

* 'माझ्यावर संकट आलं तर तुम्ही मदतीला याला,मीही सांगतो तुमच्यावर संकट आलं तर हा उद्धव ठाकरे तुमच्या मदतीला धावून येईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं'

* मी तुम्हाला मुख्यमंत्री नसताना सांगितलं होतं,कर्जमाफी करून दाखवीन. आणि मुख्यमंत्री झाल्यावर ते करून दाखवलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT