Dharashiv Loksabha Constituency : राहुल गांधी पंतप्रधान होणारच नाहीत, मग विरोधकांचा खासदार कशाला? जानकरांनी वाजवली शिट्टी!

Lok Sabha Election 2024 : अर्चना पाटील यांना ओबसीसींची 90 टक्के मिळतील," असा दावा जानकरांनी केला.
Dharashiv Loksabha Constituency
Dharashiv Loksabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर ज्या पक्षाची सत्ता येणार आहे, त्या पक्षाचा खासदार निवडून दिला पाहिजे. आमचे नेते नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणायचा असेल, इथल्या सिंचनाचा, एमआयडीसी, रोजगाराचा प्रश्न सोडवायचा असले तर महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना खासदार म्हणून निवडून दिल्लीला पाठवावं लागेल, असे आवाहन रासपचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. (Latest Marathi News)

विरोधी पक्षाचा खासदार निवडून देऊन काही उपयोग आहे का? त्यांच्या पक्षाची सत्ता येणार आहे का? राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत का? असा सवालही महायुतीचे परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांनी केला. धाराशिव येथे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत जानकर बोलत होते. धाराशिव जिल्ह्याचा काही काळ मी पालकमंत्री होतो, त्यामुळे मला इथल्या प्रश्नांची जाण आहे, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. केंद्रात पुन्हा मोदी सरकार येणार आहे, त्यामुळे निधी खेचून आणायचा असले तर अर्चना पाटील यांना खासदार म्हणून निवडून पाठवावे लागेल. आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे मितभाषी आहेत, ते कमी बोलतात पण काम जास्त करतात, त्यामुळे इथे विकास कामाला निधी कमी पडणार नाही, असेही जानकर म्हणाले.

Dharashiv Loksabha Constituency
Vandana Chavan News : फडणवीसांची प्रतिमा खलनायकी, तोडफोडीला मतदार कंटाळले: खासदार चव्हाणांनी डागली तोफ!

"विरोधी पक्षाचा उमेदवार वडिलांच्या नावाने मत मागतो, पण राणा पाटील त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मत मागत आहेत, असेही जानकर म्हणाले. परभणी लोकसभा मतदारसंघातून आपण 85 हजार मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा त्यांनी केला. देश पातळीवरील इंडिया (India) आघाडीत पंतप्रधान पदाच्या उमेदवारी वरून वाद सुरू आहे. ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव अशी अनेक नेते मंडळी या पदासाठी भांडतांना दिसत आहेत. त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरत नाहीये, त्यामुळे तिथे काय गोंधळ आहे, हे वेगळ सांगायची गरज नाही," या मुद्द्यावरही त्यांनी लक्ष वेधले.

Dharashiv Loksabha Constituency
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यात धुरळा उडणार, शरद पवार शशिकांत शिंदेंसाठी, तर फडणवीस उदयनराजेंसाठी मैदानात
Dharashiv Loksabha Constituency
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

"सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून दिला, तर मतदारसंघाच्या विकासासाठी निधी केंद्राकडून खेचून आणता येईल. विरोध पक्षाच्या खासदार निवडून देऊन काय उपयोग होणार आहे? राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत का? असा टोलाही जानकर (Mahadev Jankar) यांनी लगावला. महादेव जानकर यांनी माझ्यासारख्या माणसासाठी परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा सोडल्याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे आभार व्यक्त केले. तसेच अर्चना पाटील यांना ओबसीसींची 90 टक्के मिळतील," असा दावा जानकरांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com