Dharashiv News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला होता. आता त्याला ठाकरे आपल्या डरकाळीतून प्रत्युत्तर देण्यासाठी येत्या 16-17 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना फुटीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. या निष्ठेच्या जोरावरच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेना व महायुतीला धक्का देण्याच्या तयारी उद्धवसेना करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला धाराशिव जिल्ह्यातूनही रसद पुरवली गेली. या सगळ्याचा समाचार आपल्या खास ठाकरे शैलीत उद्धव ठाकरे घेणार आहेत. यातून एकनिष्ठ शिवसैनिकांमध्ये उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि विरोधकांना आव्हानही ठाकरे जनसंवाद यात्रेतून देणार आहेत. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्यानंतर धाराशिव लोकसभेचा गड राखण्याचे आव्हान ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांसमोर असणार आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमरगा, तुळजापूर, कळंब, भूम व लातूर जिल्ह्यातील औसा येथे उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar ) यांनी दिली. धाराशिव लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. आतापर्यंत पाच वेळा या मतदारसंघाने शिवसेनेचा खासदार निवडून दिल्लीत पाठवला. 1996 व 1999 मध्ये शिवाजी कांबळे, 2004 कल्पना नरहिरे, 2014 रवींद्र गायकवाड, तर 2019 च्या निवडणुकीत ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे विजयी झाले.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) हा पहिलाच धाराशिव दौरा असल्यामुळे त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चार पैकी तीन मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या रुपाने पहिल्यांदा कमळ फुलले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिव- कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर शिंदे सेनेमध्ये परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत व उमरगा- लोहाराचे आमदार ज्ञानराज चौगुले सामील झाले. जिल्ह्यात महायुतीने मेळावा तसेच विविध कार्यक्रम घेऊन धाराशिव लोकसभा जिंकण्याचा निर्धार केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस कुठेही दिसत नाही. या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे धाराशिव लोकसभेचा गड राखण्यात यशस्वी ठरतील का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.