Jalna News : स्टील उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नुकतीच वंदे भारत सुपरफास्ट रेल्वेचे उद्घाटन झाले. त्यानंतर आता जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी विशेष जोर लावला आहे. गोरंट्याल यांच्याकडून या रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, येणाऱ्या विधानभा निवडणुकीपुर्वी या मेडिकल काॅलेजची मुहूर्तमेढ रोवली जावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. (Latest Marathi News)
औद्योगिक, शैक्षणिक, रेल्वे विकासाच्या बाबतीत जालन्याने गेल्या काही वर्षात कात टाकली आहे. जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे हे केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असल्यामुळे जालन्यात अनेक संस्था, ड्रायपोर्ट, रेल्वे पीटलाईन, दुहेरीकरण, विद्युतीकरणासह जनशताब्दी, वंदे भारत सारख्या महत्वाकांक्षी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला गेला. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने जालन्यात विकासकामे होत असतांना आता आमदार कैलास गोरंट्याल यांनीही जालन्यातील मेडिकल काॅलेजसाठी जोर लावला आहे.
याच्या मंजुरीपासून, नियोजित जागा, त्याचा आराखडा तयार करण्याच्या कामात ते स्वतः लक्ष घालतांना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंबड रोडवरील जागेची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अंबड रोडवरील काजळा फाट्याजवळील वृद्धाश्रमाच्या शेजारी असलेली शासकीय जमीन या वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कन्हैयानगर परिसरात असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी करून सदर जागा निश्चित करून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जागेची मोजणीही करण्यात आली होती.
मात्र, प्रशासकीय पातळीवर या जागेबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता काजळा रोडवरील जागेची तहसीलदार छाया पवार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर चौधरी यांच्यासह आमदार गोरंट्याल यांनी शासकीय जमिनीची आज पाहणी केली. येथे शासनाची तब्बल ५१ हेक्टर जमीन उपलब्ध असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 25 एकर जमिनीची आवश्यकता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या जमिनीची पाहणी केल्यानंतर सदर जागा निश्चित होईल, असा विश्वास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील महायुती सरकारने जालना महापालिकेला मान्यता दिल्यानंतर आता मेडिकल काॅलेजची सर्वांना प्रतिक्षा आहे. कैलास गोरंट्याल यांनी गेल्या वर्षभरापासून सातत्याने मेडिकल काॅलेजचा आग्रह सरकारकडे धरला. विधीमंडळ अधिवेशनात मंजूरीसाठी होणाऱ्या विलंबावरून गोरंट्याल यांनी आपल्या खास शायरांना अंदाजात सरकारला टोलेही लगावले होते. आता कुठे या प्रक्रियेला वेग येतांना दिसतो आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.