MLA Kailas Gorantyal News : सत्तार, राणेंना अंगावर घेत आमदार गोरंट्याल यांनी वेधले लक्ष..

Jalna News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्पमित्रांचे संरक्षण आणि विमा हे विषय सभागृहात मांडत त्यांनी विकासकामांवरही भर दिला.
MLA Kailas Gorantyal News
MLA Kailas Gorantyal News Sarkarnama
Published on
Updated on

Marathwada Congress News : काँग्रेसचे जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल हे आपल्या शायराना अंदाजासाठी नेहमीच ओळखले जातात. विधीमंडळ अधिवेशनात विषय कितीही गंभीर असो, याची सुरूवात किंवा शेवट गोरंट्याल यांच्या शायरीनेच होतो. (MLA Kailas Gorantyal News) विशेष म्हणजे आपल्या या शायराना अंदाजातूनही ते विरोधकांना आणि सत्ताधाऱ्यांना टोले लगावतात. सध्या कैलास गोरंट्याल यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

MLA Kailas Gorantyal News
Ashok Chavan : ''नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी केंद्रीय पथक येणार असेल, तर...'' ; अशोक चव्हाणांचं विधान!

राज्याचे अल्पसंख्याक व वक्फ मंत्री (Abdul Sattar) अब्दुल सत्तार, भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अंगावर घेत गोरंट्याल यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. विधीमंडळ अधिवेशनात सध्या दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता आणि त्याचे राजकारण्यांशी असलेले संबंध हा मुद्दा चांगलाच तापला आहे. आमदार नितेश राणे यांनी नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा एका पार्टीतील व्हिडिओ जारी केला.

पार्टीत बडगुजर हे कुख्यात सलीम कुत्ता याच्यासोबत नाचत असल्याचा आरोप करत राणे यांनी खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची तात्काळ दखल घेत बडगुजर यांची एसआयटी चौकशी लावली. (Kailas Gorantyal) सत्ताधाऱ्यांनी घेरल्यानंतर यावर पलटवार करण्यासाठी महाविकास आघाडीकडून आधी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मैदानात उतरले. तर त्यांच्या साथीला गोरंट्यालाही आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ खडसे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सलीम कुत्ता यांचा एकत्रित फोटोच सभागृहात दाखवला, तर गोरंट्याल यांनी राणे यांना वेडा ठरवत सलीम कुत्ताची 1998 मध्येच छोटा राजनच्या गुंडांनी हत्या केल्याचा दावा केला. नितेश राणेंनी हा नवा सलीम कुत्ता कुठून आणला असे म्हणत त्यांना आव्हान दिले. महाविकास आघाडीची ही खेळी यशस्वी ठरली आणि सत्ताधारी चांगलेच संतापले.

देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावरील खडसे यांनी केलेले आरोप फेटाळत कुरघोडीचा प्रयत्न केला. पण कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या दाव्यावर मात्र सत्ताधारी पक्षाकडून उत्तर आले नाही. दादा भुसे यांनी गोरंट्याल यांचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यात आत्मविश्वास दिसत नव्हता. या उलट गोरंट्याल यांनी सलीम कुत्ता याचा 98 मध्येच खून झाल्याचा दावा करतांना पाहिजे तर माझी चौकशी करा, मी इथेच आहे, असे आव्हान सत्ताधाऱ्यांना देत बाजी मारली.

MLA Kailas Gorantyal News
MLA Kailas Gorantyal News : मेडिकल काॅलेजसाठी सत्तारांकडून बोगस कागदपत्रे, काँग्रेस आमदाराचा खळबळजनक आरोप..

विधीमंडळाच्या दुसऱ्या आठवड्यात कैलास गोरंट्याल यांनी आमदार नितेश राणे यांना अंगावर घेत लक्ष वेधले. तर पहिल्या आठवड्यात गोरंट्याल यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जमीनी हडपल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती. या शिवाय जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्पमित्रांचे संरक्षण आणि विमा हे विषय सभागृहात मांडत त्यांनी विकासकामांवरही भर दिल्याचे दिसून आले.

Edited By : Jagdish Pansare

MLA Kailas Gorantyal News
Kailas Gorantyal: सलीम कुत्ताची 1998 मध्येच हत्या; गोरंट्याल यांचा खळबळजनक दावा, राणे म्हणतात तो 'कुत्ता' कोण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com