Sanjay Jadhav: सहा खासदार फुटल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे येत्या 28 रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत. पदाधिकारी, शिवसैनिक आणि ज्या परभणीकरांनी ठाकरेंवर, त्यांच्या पक्षावर भरभरून प्रेम केले, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ते येणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांना उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याविषयी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी नाही, ते मला समजून घेतील.
पक्ष, संघटना वाढीसाठी ते येत आहेत, त्यात काही वावगे नाही तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच त्यांचे स्वागत करू, असे सांगत जाधव यांनी ठाकरे यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो, असे मान्य केले. बदलती राजकीय समीकरण, परिस्थितीमुळे काही निर्णय इच्छा नसताना घ्यावे लागतात, अशी खंतही खासदार जाधव यांनी व्यक्त केली.
कथित 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरेंच्या पक्षाचे सहा खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेते दाखल झाले. त्यानंतर मराठवाड्यासह राज्यात त्या त्या खासदारांच्या मतदारसंघात समर्थन आणि विरोध सुरू आहे. परभणी जाधव यांच्याविरोधात ठाकरेंच्या पक्षाने जोडे मारो आंदोलन, प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत रोष व्यक्त केला होता. तुडवाच्या भाषेला खासदार जाधव व त्यांच्या समर्थकांकडूनही जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली गेली.
या सगळ्या तापलेल्या वातावरणात उद्धव ठाकरे 28 जून रोजी परभणी दौऱ्यावर येत आहेत, ते पक्षप्रमुख आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांचे येणे स्वाभाविक आहे. परभणीत त्यांचे स्वागतच केले जाईल, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे. ठाकरे कुटुंबाबद्दल आपली कोणतीही नाराजी नाही. राजकीय समीकरणे बदलली, त्यामुळे इच्छा नसतानाही मला निर्णय घ्यावा लागला. उद्धव ठाकरे मला समजून घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माझ्या राजकीय प्रवासात ठाकरे परिवाराचे मोठे योगदान आहे. त्यांनी मला घडवले असून त्यांच्याबद्दल आमच्या मनात कायम आदर आहे. उद्धव ठाकरे यांच्या परभणी दौऱ्यामुळे आणि संजय जाधव यांच्या प्रतिक्रियेनंतर जिल्ह्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संजय जाधव यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करायची नाही, असे जाहीर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.