

Kolhapur News : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. चार दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांची सहा खासदारांनी साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आता आणखी एक धक्का बसला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कोल्हापुरातील जिल्हाप्रमुखांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असताना इंगवले यांनी कोणतेही कारण आता अथवा राजकीय विश्लेषण न देता राजीनामा देत असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. इंगवले यांनी यापूर्वी दोन वेळा शहर प्रमुख आणि सध्या जिल्हाप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला होता.
गेल्या काही दिवसांपासून व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे जिल्हाप्रमुख इंगवले चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच गुरुवारी त्यांनी पत्र पाठवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजनीमा पाठवून दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मी कंटाळलो आहे. विरोधक म्हणून सत्ताधाऱ्याना अंगावर घेऊन काम केले आहे. मात्र आता काम करण्याची इच्छा नाही. यापूढे माझ्या विरोधात जो बोलेल, त्याचा पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले जाईल. पुढील वाटचालीबाबत अद्याप कोणताच राजकीय निर्णय घेतला नाही, अशी प्रतिक्रिया रविकिरण इंगवले यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.