Manoj Jarange Patil On Walmik Karad  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange On Valmik Karad : या जातीयवादी टोळीला सांभाळणारा व्यक्ती कोण? त्याला महाराष्ट्रासमोर आणा!

Who is in charge of the communal gang? Bring them before Maharashtra : वाल्मिक कराडला मोक्का लावला आता त्याला 302 लावा. वाल्मीक कराडची टोळी राज्यभर पसरलेली आहे, त्या सगळ्यांवर कारवाई करा.एका व्यक्तीसाठी राज्याला वेठीस धरू नका.

Jagdish Pansare

जालना : वाल्मीक कराडवर मकोका लावला तसे 302 चे कलमही लावा. वाल्मीक कराड आणि त्यांच्या जातीयवादी टोळीला सांभाळणारा व्यक्ती कोण? त्याला आता महाराष्ट्रासमोर आणा, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांनी कराड याच्यावर मोक्का लागल्यानंतर भाष्य केले. एका व्यक्तीसाठी सगळ्या राज्याला वेठीस धरू नका, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाचा संबंध अवादा कंपनीला मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीशी आहे. खंडणी प्रकरणातूनच हा खून झाला, असा आरोप करत विरोधक तसेच सत्ताधारी पक्षाच्या (Beed News) बीड जिल्ह्यातील आमदारांनी वाल्मीक कराड याच्यावर मोक्का लावून कलम 302 अतंर्गत कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली होती.

यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आज वाल्मीक कराड यांची सीआयडी कोठडी संपून त्याला न्यायायलीन कोठडीत पाठवण्यात आले. त्यानंतर लगेच कराड याच्यावर मोक्काही लावण्यात आला. सरपंच संतोष देशमुख कुटुंबियांच्या मागणीला यामुळे यश आले आहे.यावर मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य करताना या खून प्रकरणातील एकाही आरोपीला सोडू नका, या जातीयवादी टोळ्यांना सांभाळणारी व्यक्ती कोण आहे, ती महाराष्ट्रासमोर आणा, अशी मागणी केली.

वाल्मिक कराडला मोक्का लावला आता त्याला 302 लावा. वाल्मीक कराडची टोळी राज्यभर पसरलेली आहे, त्या सगळ्यांवर कारवाई करा.एका व्यक्तीसाठी राज्याला वेठीस धरू नका, अशी मागणीही जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. खून आणि आणि खंडणी प्रकरणातील आरोपी हे एकच आहेत. यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा.

या सगळ्यांना सांभाळणारे कोण? यांना पैसा कुणी पुरवला? याचाही शोध लावला पाहिजे. ही टोळी जातीयवादी आहे, काही लोकांनी त्यांच्या जातीला बदनाम केलं. हाणामाऱ्या, खून, खंडणीतील या टोळीमुळे संपूर्ण जात बदनाम होते. ही टोळी ही राज्यभर पसरलेली आहे. त्यांना जोपर्यंत कायद्याच्या कचाट्यात पकडत नाही तोपर्यंत उपयोग नाही. या सगळ्यांचा नायनाट केला पाहिजे. यातील एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT