Sattar-Save-CM Fadanvis News Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Political News : ते पुन्हा आले, 'हे' पुन्हा येतील का ? सावे, सत्तार मंत्री होणार का?

Will Shinde's beloved Sattar and Fadnavis' trusted Save become ministers? : भाजपचे अतुल सावे, शिवसेनेचे अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्री म्हमून सरकारमध्ये स्थान मिळाले होते. आता महायुतीचे सरकार राज्यात अधिक भक्कमपणे सत्तेवर आले आहे.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : महायुतीच्या सरकारचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. सोबतीला एकनाथ शिंदे-अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून आहेतच. फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर घरवापसी झाल्याने त्यांच्या 'मी पुन्हा येईन'ची चर्चा जोरात होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत ताणल्यामुळे शिवसेना सरकारमध्ये सहभागी होणार की नाही? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

पण भाजपच्या नेत्यांचा काॅन्फिडंस पाहता शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याचा अंदाज होता, तो खराही ठरला. आता प्रतिक्षा आहे ती मंत्रीमंडळ विस्ताराची. शिंदेंनी शपथ घेतल्यामुळे शिवसेनेच्या आमदा आणि भावी मंत्र्यांचा जीव भांड्यात पडला आहे. (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीन मंत्री होते. यात भाजपच्या वाट्याला एक तर दोन मंत्री पदे शिवसेनेकडे होती.

भाजपचे अतुल सावे, शिवसेनेचे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्री म्हमून सरकारमध्ये स्थान मिळाले होते. आता महायुतीचे सरकार राज्यात अधिक भक्कमपणे सत्तेवर आले आहे. पुन्हा येईन म्हणत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून 'पुन्हा आले' आता त्यांच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील अतुल सावे, अब्दुल सत्तार हे मत्री `पुन्हा येतील का`? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील हे दोन्ही मंत्री या निवडणुकीत आपापल्या मतदारसंघातून अगदी काठावर निवडून आले आहेत. सावे यांना एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी घाम फोडला होता. तर एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असा दावा करणाऱ्या अब्दुल सत्तारांचे विमान कोसळता कोसळता राहिले. जेमतेम 2420 मतांनी ते तरले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुरेश बनकर यांनी सत्तार यांच्या तालुक्यातील सत्तेला हादरे दिले.

मंत्रीमंडळातील समावेशासाठी ज्या संभाव्य याद्या समोर येत आहेत, त्यात अब्दुल सत्तार यांच्या नावाला भाजपचाच विरोध असल्याचे बोलले जाते. सावे यांचे नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आहे, ते फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांचा नंबर पुन्हा लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

तिकडे शिवसेनेत जिल्ह्यातील संजय शिरसाट आणि माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. गेल्या अडीच वर्षापासून वेटिंगवर असलेल्या शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांना पसंती देतात? की मग पुन्हा सत्तार यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते? यासाठी आठवडाभर प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT