Eknath Shinde : मोठी अपडेट! भाजपचा गृह अन् नगरविकास खातं देण्यास स्पष्ट नकार, आता शिंदेंची 'या' खात्याची 'डिमांड'

Maharashtra Government Portfolio Allocation : एकनाथ शिंदेंनी मागितलेली खाती त्यांना न मिळाल्यास ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिंदेंऐवजी दुसरा कोणता तरी नेता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah
Eknath Shinde-Narendra Modi-Amit shahSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Dec : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र अद्याप एकनाथ शिंदे या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? हे स्पष्ट झालेलं नाही.

अशातच आता एकनाथ शिंदेंनी मागितलेली खाती त्यांना न मिळाल्यास ते उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिंदेंऐवजी दुसरा कोणता तरी नेता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे आज संध्याकाळी पार पडणाऱ्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्यासोबत तिसरा कोणता नेता शपथ घेणार याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. निकालानंतर महायुतीच्या सत्तास्थापनेच्या चर्चा सुरू झाल्यापासून एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.

Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah
Devendra Fadnavis : राज्यात उपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री होत नाही 'हे' मिथक फडणवीसांनी काढले मोडीत

मात्र, भाजपकडून (BJP) त्यांना गृह खातं देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. शिवाय गृहखात्यानंतर नगरविकास खातंही शिंदेंना मिळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या दोन्ही खात्यानंतर शिंदेंचं घोडं महसूल खात्यावर अडकल्याची माहिती आहे.

शिवाय ⁠महसूल खाते शिवसेनेला (Shivsena) दिलं तरंच एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि हे खातं ⁠शिवसेनेला न मिळाल्यास शिवसेनेचा दुसरा नेता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिंदेंनंतर दादा भुसे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde-Narendra Modi-Amit shah
Mahayuti News : गृहखात्यावरून शिंदे नाराज असतानाच शिवसेनेतील 'या' वादग्रस्त नेत्यांना मंत्रीपद देण्यास भाजपचा विरोध?

दरम्यान, आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून उरलेल्या नेत्यांचे शपथविधी 7 तारखेला होण्याची शक्यता आहे. राजभवनात उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील दोन दिवसांत खाते वाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर महायुतीत एकमत झाल्यानंतर हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com