CM Eknath Shinde, Tanaji Sawant Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Political News : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसैनिक मेळाव्यात तानाजी सावंत ताकद सिद्ध करणार ?

First get together of Shivsainiks : एकनाथ शिंदेंच्या हजेरीत जिल्ह्यातील पहिला मेळावा ; शिवसंकल्प अभियान दौरा राज्यभर सुरू होणार...

सरकारनामा ब्यूरो

- शितल वाघमारे

Dharashiv Political News : महाराष्ट्रात सत्ता बदला नंतर पहिल्याच मंत्रिमंडळात आ.तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले. परंतु त्यांनी मतदारसंघात समाधान शिबिरे, आरोग्य शिबीर हे फक्त शासकीयच कार्यक्रम राबविले. कोणताही पक्ष मेळावा, पक्षबांधणी, पक्षवाढीसाठी कोणतेही विशेष कार्यक्रम घेतले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात आहे.

यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) च्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसैनिकांचा पहिला मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षाची ताकद सिद्ध करण्याचे आव्हान आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यासमोर असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 6 जानेवारीपासून यवतमाळ येथून शिवसंकल्प अभियान दौरा राज्यभर सुरू करणार आहेत. हा दौरा भाजपच्या मिशन 45 अंतर्गत आयोजिला आहे.

मुख्यमंत्री शिंदे हे 10 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात पदाधिकार्‍यांची बैठक, कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. हा मेळावा यशस्वी व्हावा, यासाठी पालकमंत्र्यांचे बंधू शिवाजी सावंत मैदानात उतरले आहेत. त्यांनी बुधवारी (ता. 3) धाराशिव शहरात पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेऊन मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात सर्व जुन्या शिवसैनिकांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी वर भर दिला आहे. पालकमंत्र्यांच्या सोबत ठाकरे सेनेला शक्ती दाखवण्यासाठी एकवटण्याचे आव्हान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावरही असणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा दुसरा जिल्हा दौरा पहिला धाराशिव दौरा हा शासकीय होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा दुसरा दौरा पूर्णतः संघटनात्मक आहे. आजवर झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी सलग अकरा वेळा काँग्रेस यशस्वी झाली होती. त्यानंतर शिवसेनेने चंचूप्रवेश केला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकसभेत धाराशिव जिल्ह्याने शिवसेनेचा खासदार पाच वेळा निवडून दिला. शिवसेना फुटल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील मतदारांना साद घालण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः धाराशिव जिल्ह्यात येत आहेत.

जिल्ह्यातील मतदार आणि सर्वसामान्य नागरिक एकनाथ शिंदेंना समर्थन देण्यासाठी किती गर्दी करतात. यावर जिल्ह्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची एकनिष्ठ आहे की शिंदे शिवसैनिकांसह सर्वसामान्य नागरिकांना आपलेसे करण्यात यशस्वी झाली, याचा प्रत्यय दहा तारखेच्या शिवसेना मेळाव्यातून येणार आहे.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT