EKnath shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Mumbai civic elections : चक्क भाजपकडूनच 50 खोके एकदम ओके'च्या घोषणा : एकनाथ शिंदेंचे एकाच वाक्यात उत्तर

Eknath Shinde reaction News : प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांसमोर शिवसेनेचे कार्यकर्ते समोर आल्यावर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचारासाठी शेवटचा पाच दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच मुंबई महापालिका निवडणुका भाजप व एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुती करून लढवत आहे. मात्र, या दोन मित्रपक्षात आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी रॅलीवेळी '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी घराचा आहेर समजला जात आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या (Shivsena) पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर अशी मैत्रिपूर्ण लढत होत आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांचा प्रभागात प्रचार सुरू होता. प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांसमोर शिवसेनेचे कार्यकर्ते समोर आल्यावर 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी देण्यास सुरूवात केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.

मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी '50 खोके एकदम ओके'च्या घोषणा दिल्या. मात्र, मित्रपक्ष असलेल्या भाजपनेच (BJP) अशा घोषणा दिल्याने साहजिकच शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. या सगळ्या प्रकरणावर आता स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देण्याआधी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना विचारा, अशा घोषणा देणारे आज कुठे गेले ते एकदा तपासा, असा टोला मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. त्यामुळे यावरून भाजप व शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकमेकांवर टीका करीत आहेत.

'अकरा खोके एकदम ओके' अशी घोषणा द्याला हवी होती

आमच्या तोंडातून थोडासा चुकीचा शब्द निघाला आहे. त्यांनी जी प्रॉपर्टी जाहीर केली आहे त्यानुसार 50 खोके नाही तर 'अकरा खोके एकदम ओके', अशी घोषणा द्यायला हवी. त्याची जंगम प्रॉपर्टी 11 कोटी आली कुठून? त्यामुळे आम्ही नवी घोषणा सुरू केली आहे. ही घोषणा फक्त आमचे मित्र रामदास कांबळे आणि त्यांच्या उमेदवार पत्नी यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक घोषणा आहे, त्यांच्या पक्षासाठी ही घोषणा नाही. ही लढाई होणारच आहे. कारण माझी तिकीट त्याने चोरली आणि लोकांना दाखवलं की त्याची तिकीट मी चोरली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून त्याने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीट घेतलं, असे दत्ता केळुस्कर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT