Uddhav Thackeray convenes a meeting of party MPs as political circles discuss the impact of the alleged ‘Operation Tiger’ in Maharashtra politics. Sarkarnama
महाराष्ट्र

Operation Tiger News : 'मातोश्री'वरील बैठकीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचे रोखठोक विधान; ऑपरेशन टायगरची हवा काढतानाच महायुतीची धाकधूक वाढवली

Nagesh Patil Ashtikar News : सत्ताधारी मंडळींकडून कोणत्या तरी विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अशास्वरूपाच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे स्पष्ट केले.

Sachin Waghmare

Mumbai News : ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे सांगून केवळ अफवा पसरविण्याचा व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून काहीच होत नाही, हे आपण बघितलेले आहे. अशा प्रकारच्या अफवा महिन्या-दोन महिन्यानंतर पसरविण्याचे काम केले जात आहे. त्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. आमचे नेते उद्धव ठाकरे यांना सर्वच गोष्टी माहित आहेत. सत्ताधारी मंडळींकडून कोणत्या तरी विषयावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अशास्वरूपाच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे हिंगोलीचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी स्पष्ट केले.

नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नागेश पाटील-आष्टीकर यांनी ऑपरेशन टायगरची हवाच काढली. त्यासोबतच नांदेड विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारात सक्रिय असल्याचे सांगत एकीकडे महायुतीची धाकधूक वाढवली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील-आष्टीकर यांना उतरविण्यात आले आहे.

ऑपरेशन टायगरबाबत मंत्री संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांना काही माहिती असेल तर त्यांनी सर्वासमोर येऊन मोकळ्या मनाने सांगितले पाहिजे. काय झाले, कसले ऑपरेशन टायगर आहे, त्यामध्ये कोण आहे, त्याबद्दल त्यांना किती माहिती आहे, हे सर्व काही शिरसाट यांनीच सांगितले पाहिजे, असेही पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आष्टीकर यांनी स्पष्ट केले.

मातोश्रीवर 14 जून रोजी खासदारांची बैठक होत असून या बैठकीला जाण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. मात्र, सर्वांना माहीतच आहे की, नांदेड विधानपरिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी माझ्या मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामधून थोडासा जरी वेळ मिळाला तर मी या बैठकीसाठी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत परत येण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार आष्टीकर यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची (Shivsena) वाट धरली आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून ठाकरे सेनेचे निवडून आलेल्या 9 पैकी 7 खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबविले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जूनला) मातोश्रीवर ही बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT