Uddhav Thackeray Action : उद्धव ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'वर, खासदारांची बैठक बोलावली, मोठा निर्णय होणार!

Uddhav Thackeray Calls MP Meeting : महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर झाल्याच्या चर्चा आहेत. त्या विरोधात उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी रविवारी (ता.14) खासदारांना बोलावले आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray convenes a meeting of party MPs as political circles discuss the impact of the alleged ‘Operation Tiger’ in Maharashtra politics.Sarkarnama
Published on
Updated on

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरच्या चर्चा सातत्याने सुरु आहेत. उद्धव ठाकरेंचे सात खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. काही खासदार नाॅट रिचेबल होणार असल्याची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले आहेत.

आपल्या सर्व खासदारांची बैठक त्यांनी रविवारी (ता.14) 'मातोश्री'वर आयोजित केल्याची माहिती आहे. सर्व खासदारांना या बैठकीला बोलवण्यात आले आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात धाराशिवमध्ये अंबादास दानवे यांच्या उपस्थित बैठक पार पडली. त्यावेळी खासदार ओमराजे गैरहजर असल्याने त्यांच्या नावावर देखील संशय व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातील दुसरे खासदार संजय जाधव हे मागील वेळी बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे या वेळी बैठकीला हजर राहणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत.

पुढारी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत ठाकरेंच्या सात खासदारांशी त्यांची चर्चा झाली आहे. ऑपरेशन टायगर अ‍ॅक्टिव्ह झाले असून ठाकरेंच्या मराठवाड्यातील एका खासदाराला थेट मंत्रि‍पदाची ऑफर देण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
UBT Shivsena : मराठवाड्यातील आणखी एक खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा, 'त्या' बैठकीला दांडी!

दरम्यान, या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ज्यांना जायचे होते ते आधीच गेले आहेत, असे ते म्हणाले होते.मात्र, आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे बैठक घेत खासदारांचे प्रश्न समजून घेणार आहेत.

टीएमसीत फूट, ठाकरे सावध

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीमध्ये फूट पडली आहे. तब्बल 20 खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. त्यामुळे पक्ष वाचवण्याचे मोठे आवाहन ममता बॅनर्जींच्या समोर उभे राहिले आहे. फुटलेल्या गटाने आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे सावध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी खासदारांची बैठक बोलवण्याची चर्चा आहे.

Uddhav Thackeray
Maharashtra Politicse : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, उद्धव ठाकरेंचे सात खासदार फुटणार, मंत्रिपदाची डील फायनल; एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com