Deekshabhoomi Under Ground Parking Issue  sarkarnama
महाराष्ट्र

Video Deekshabhoomi Parking Issue : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध, बांधकाम साहित्य फेकले

Roshan More

Deekshabhoomi News : नागपूरमधील दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकर अनुयायांनी विरोध केला आहे. दीक्षाभूमी परिसरात अंडरग्राऊंड पार्किंग सुरू आहे. याच परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आंबेडकर अनुयायी येत असतात. येथेच राहुट्या टाकत असतात.मात्र, या पार्किंगमुळे त्यांची गैरसोय होणार आहे. दिक्षा स्मारक समितीने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली होती. मात्र, संतप्त झालेल्या आंबेडकर अनुयायांनी अंडरग्राऊंड पार्किंगच्या बांधकामाचे साहित्य फेकून दिले. मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायी येथे जमले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आले आहे.

विधिमंडळात प्रश्न उपस्थित

आमदार नितीन राऊत Nitin Raut यांनी विधानसभेत दीक्षाभूमीच्या अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला. या कामामुळे स्तुपाला भेगा पडण्याचा धोका आहे. स्तुप पडू शकते. येथील काम लगेच थांबवले पाहिजे.

दीक्षाभूमीचे महत्व काय?

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar यांनी आपल्या लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धम्म स्वीकारला. ‘धम्मचक्र प्रवर्तन दिनी’ येथे जगभरातील अनुयायी येत असतात. येथील स्तुपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंचे जतन देखील करण्यात आले आहे.

नेते काय म्हणाले?

- प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुठलीही पार्किंगची मागणी नसतांना ट्रस्टींनी त्याचा घाट घातला.आमचाही या पार्किंगला विरोध आहे. आंदोलनकारी जनतेच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी आहे.

- आनंदराज आंबेडकर म्हणाले, सुशोभिकरणाच्या कामाला विरोध नाही. मात्र, पार्किंगची मागणी नसतानाही ती केली जाते आहेत. मात्र, त्यामुळे दीक्षाभूमीच्या स्ट्रक्चरला धोका निर्माण झाला आहे. हे काम बंद करण्याची मागणी आहे.

- जितेंद्र आव्हाड म्हणाले, ते श्रद्धेय स्थान आहे. लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. तेथे लोकांच्या भावना का दुखवता? या विषयी आम्ही बोललो तर खोटो नेरेटिव्ह सेट करता असे म्हणतात. हे सरकार दलित विरोधी, बहुजन विरोधी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT