Nana Patole Uddhav Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : नाना पटोलेंचा 'मातोश्री'वर फोन, उद्धव ठाकरे 'नाॅट रिचेबल'? पुढं काय होणार...

Legislative Council Elections : मुंबई, कोकण आणि नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून समोरे जावे, यासाठी काँग्रेसचे नाना पटोले यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संपर्क केला आहे.

Pradeep Pendhare

Shiv Sena Thackeray Vs Congress : राज्यात विधानपरिषदेच्या होत असलेल्या 4 जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घमासान सुरू झालं आहे. 'महाविकास आघाडी म्हणून जागांचा घोळ बसवून मिटवा, यासाठी 'मातोश्री'वर फोन केला होता. परंतु उद्धव ठाकरेंशी संपर्क होऊ शकला नाही. उद्या अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. तोपर्यंत घोळ मिटला तर पाहू', असे सूचक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राज्यात मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे दोन जागा जाहीर केल्या आहेत. याशिवाय नाशिक आणि कोकणमध्ये देखील उमेदवार दिले आहेत. या चारही जागांवर काँग्रेसने देखील उमेदवार दिले आहे.

या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना (Shiv Sena) ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे धडपड सुरू आहे. पण शिवसेना ठाकरे पक्षाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांमध्ये वाद वाढले आहेत.

नाना पटोले (Nana Patole) यांनी या जागांवर महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन चर्चा करून वाद मिटवावेत, अशी भूमिका पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे. नाना पटोले म्हणाले, "या चारही जागा महाविकास आघाडी म्हणून जिंकण्यासारख्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून एकत्र बसून चर्चा व्हायला हवी.

यासाठी मातोश्रीवर चर्चा करण्यासाठी फोन केला होता. परंतु उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही". अर्ज उद्या माघार घेण्याची वेळ आहे. अजूनही संधी गेलेली नाही. आमचे देखील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. जागा वाटपाबाबत एकत्र बसून निर्णय घेता येऊ शकतो, असे नाना पटोले यांनी म्हटले.

शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'भटकती आत्मा' या मुद्यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्याचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ही आत्मा तुम्हाला शांत बसू देणार नाही, असा इशारा दिला आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ नेत्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान निषेधासारखेच आहे. पवारसाहेबांनी त्याला काल दिलेले उत्तर चोख असेच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT