Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole News : पक्षविरोधी कारवाई करणाऱ्याला अभय देणार नाही; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

Sachin Waghmare

Mumbai News : पक्षांविरोधी कारवाई करणाऱ्या कोणाला ही माफ केले जाणार नाही. ज्यांनी व्हीप तोडले त्यांना ही माफ केले जाणार नाही. राष्ट्रीय महासचिव यांनी ही भूमिका घेतली आहे. काही टेक्निकल मुद्दे आहेत, जे बोलू शकत नाही. काँग्रेसची एकदम स्पष्ट भूमिका आहे. तळागळातील कार्यकर्ते ज्यांनी कायम काँग्रेसचा विचार केला त्यांना आता प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांचा सन्मान आता आम्ही करणार आहोत, काँग्रेस हायकमांडने ही माहिती दिली आहे. कोणाला ही आम्ही अभय दिलेला नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पटोले यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या दिल्लीत आहेत. ते राहुल गांधी यांना भेटणार आहेत. उद्या उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Nana Patole News)

महाराष्ट्रमध्ये ज्या पद्धतीने आज ज्या घोषणा करून मते मिळवता येतील, हा अयशस्वी प्रयत्न भाजप करत आहे. लाडकी बहीण विरोधात काही जण कोर्टात गेले आहेत. महालक्ष्मी नावाच्या आमच्या योजना होत्या. सत्तेत येण्यासाठी घोषणा केल्या नाहीत. मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना आता बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय कसे देता येईल याची ब्लू प्रिंट आम्ही तयार करत आहोत. आमच्या जाहीरनाम्यात हे सगळं टाकता येईल, असेही पटोले म्हणाले.

दिल्लीतून आता सर्व्हे सुरु झालेला आहे. काँग्रेस (Congress) कमिटीच्या वतीने आम्ही हा सर्व्हे करणार आहोत. त्यानंतर उमेदवार ठरविणे सोपे जाणार आहे. विधान परिषदेत गुप्त मतदान झाले आहे. काही दिवसात निवडणूका आल्या आहेत, ज्यांनी क्रॉस वोटिंग केले आहे, त्यांना माफ केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्याकडे मधल्या काळात मराठा समाजाचे नेते येऊन गेले आहेत. आम्ही सन्मानाने त्यांना बोलावले आणि आमची भूमिका त्यांच्या सामोर मांडली आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपने डोक्यातील फितुरीमुळे महाराष्ट्र तोडण्याचे काम केले आहे.

महाराष्ट्रामधील सर्व जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा दिली आहे. सत्तेत बसलेली लोकं आहेत, त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. सरकारने कर्ज घेताना विरोधकांना कधीही विचारले नाही. आरक्षणाच्या बदलाची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आणि आम्हाला निवडून द्या, अशी गर्जना त्यांनी केली आहे. 10 वर्ष हेच सरकार आहे, यांना थांबवलं कोणी आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र तोडला जात आहे. हा शाहू-फुले विचारांचा महाराष्ट्र आहे. 105 आमदार भाजपचे पहिल्यांदा आले आहेत. आमचे पण आले पण आम्ही कधी गद्दारी केली नाही. महाराष्ट्रच्या जनतेसोबत भाजपला 105 आमदार देऊन चुकी केली हे आता महाराष्ट्राला समजत आहे. मराठा आंदोलक आले तर आम्ही त्यांचा सन्मान करू. जी काही आरक्षणाचा व्यवस्था दिली आहे. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आली तर मराठा, आदिवासीला आरक्षण आम्ही देऊ. बहुजनांचा अवमान भाजप करत असल्याचे पाटोले यांनी सांगितले.

तेलंगणा सरकारने ज्या प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. सरकारचे अधिकारी व्यवस्थित पंचनामा करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT