New Delhi : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात न्यूरोलॉजी विभागात अडवाणी यांना दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत स्थिर असून ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याची माहिती अपोलो रुग्णालयाच्या सूत्राने दिली.
मागच्या महिन्याभरापूर्वी अडवाणी यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. (LK Aadvani News)
अडवाणी (LK Aadvani) यांना मंगळवारी येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. अडवाणींना जुलैच्या पहिल्या आठवड्यात एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
यावेळी दोन दिवस त्यांना वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यांना न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
दिल्लीतील एम्समध्ये 26 जूनला किरकोळ ऑपरेशनही झाले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
त्यानंतर सुमारे आठवडाभरानंतर रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अपोलोमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, एका दिवसानंतर लगेचच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.