Congress : काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय; विधान परिषदेला क्रॉस व्होटिंग करणाऱ्या ‘त्या’ पाच आमदारांचे तिकिट कापणार

Congress High Command Big Decision : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तिकिट न देण्याचा मोठा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 August : विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तिकिट न देण्याचा मोठा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे.

तसा आदेशच दिल्लीतील हायकमांडने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होणार, हे निश्चित आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या (Congress) पाच ते सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडून विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला होता. त्यावरून महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप रंगले होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांच्या (MLA) विरोधातील अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविला होता. काँग्रेस पक्षासोबत गद्दारी करणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी त्या अहवालाच्या आधारे केली होती.

Congress
Gayatri Shingne : डॉ. राजेंद्र शिंगणेंनी माघार घेऊन विधानसभेला मला पाठिंबा द्यावा; अन्यथा...; पुतणीने दिले चॅलेंज!

प्रदेश काँग्रेसच्या अहवालानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी निवडणुकीत तिकिट देण्यात येऊ नये, असा आदेश दिला आहे, त्यानुसार काँग्रेसमधील पाच आमदारांचे तिकिट आगामी विधानसभा निवडणुकीत कापले जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

या पाच आमदारांमध्ये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या पाच विद्यमान आमदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी पत्ता कट होणार असल्याचे स्पष्ट आहे. या पाच आमदारांच्या मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

Congress
Sharad Pawar Politics : शरद पवारांची मोठी खेळी; राजेंद्र शिंगणेंना घरातूनच आव्हान देण्याची तयारी; पुतणी उतरणार मैदानात

दरम्यान, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या मागील निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली होती. त्या वेळी पहिल्या पसंतीचे उमेदवार असलेले चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही क्रॉस व्होटिंग झाल्याने काँग्रेस हायकमांडने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com