raj thackeray, sharad pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Vs. Raj Thackeray News : राज ठाकरेंना शरद पवारांच्या शिलेदारानं डिवचलं; खालच्या माळ्यावर कोण राहते ते माहिती आहे का ?

Political News : महायुती व महाविकास आघाडीने जोराची ताकद लावली आहे. त्यामुळे चुरस वाढली असतानाच शरद पवार हे तालुक्याचे नेते असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी केली होती.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. मतदानासाठी पाच दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असताना प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. महायुती व महाविकास आघाडीने जोराची ताकद लावली आहे. त्यामुळे चुरस वाढली असतानाच शरद पवार हे तालुक्याचे नेते असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला आहे. (Jitendra Awahad News)

विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचार करताना जाहीर सभांमधून मनसेचे नेते राज ठाकरे महाविकास आघाडी व महायुती सरकावर हल्लाबोल करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. पवारांचं राजकारण हे जातीयवादी असून त्यांनीच जातीय राजकारणाची सुरुवात केल्याचं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलं होतं. त्यावरून राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्याकडून टीका केली जात आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

जो आपल्या तालुक्यात व्यवसाय, उद्योग आणतो तो तालुक्याचा नेता असतो, म्हणून शरद पवार हे तालुक्याचे नेते असल्याची बोचरी टीका राज ठाकरेंनी केली होती. त्यावर, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार केला. राज ठाकरेंना त्यांच्या खालच्या माळ्यावर कोण राहते हे तरी माहिती का, अशी खोचक टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आमदार आव्हाड यांनी शरद पवारांना तालुका लेवलचे नेते म्हटल्यानंतर राज ठाकरेंना त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना आव्हाड म्हणाले, शरद पवारांनी कधीही कोणता पक्ष फोडला नाही, त्यामुळे त्यांच्यावर हा आरोप लागू शकत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात शुक्रवारी खुद्द अजित पवार सभा घेणार आहेत, त्याआधीच जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप महायुतीतील पक्षांवर केला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका करताना जातीय मुद्दा पुढे घेतला. त्यावरुन, शरद पवारांनीही कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा जो आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची? असा सवाल शरद पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT