ShahajiBapu Patil : शहाजीबापूंचा देशमुख, साळुंखेंवर हल्लाबोल; ‘गणपतराव देशमुखांना मी संपलो नाही, तुम्ही तर कालची लेकरं..’

Sangola Assembly Constituency : दीपक आबांना मी भावासारखी वागणूक दिली. कुठंही त्यांना अडवलं नाही. निवडणूक लढविण्याबाबत विचार करून निर्णय घेऊ, असं मी म्हटलं होतं. एवढ्या घाईने त्यांनी निर्णय घ्यायला नको होता,
Dr. Babasaheb Deshmukh-Shahaji Patil-Deepak Salunkhe
Dr. Babasaheb Deshmukh-Shahaji Patil-Deepak SalunkheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 November : मॅच फिक्सिंग करून तुम्ही दोघं (दीपक साळुंखे, डॉ. बाबासाहेब देशमुख) निवडणुकीला उभारला आहात. दोघांचे झेंडे एकच, दोघांच्या नेत्यांचे फोटा एकच. दोन्ही बाजूंनी तुम्ही मला मारायला लागला आहात. पण, भाई गणपराव देशमुखांना मी संपलो नाही, तुम्ही तर कालची लेकरं, तुमच्याने ते अजिबात घडणार नाही, असे आव्हान सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार दीपक साळुंखे आणि शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सांगोल्यात महायुतीचे उमेदवार शहाजी पाटील यांच्यासाठी प्रचाराची सभा झाली. त्या सभेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, दोस्त (दीपक साळुंखे) माझा विनाकारण खवळला. दीपकआबाचं मी काय मोडलं होतं. कार्यकर्त्यांच्या शिव्या खाल्या पण राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेचा अर्धा वाटा दिला. प्रत्येक गोष्ट मी आबांची ऐकली.

माझा भाऊ सुभाषनाना वारला; पण त्या ठिकाणी मी दीपकआबाला मानलां. दीपक आबांना मी भावासारखी वागणूक दिली. कुठंही त्यांना अडवलं नाही. निवडणूक लढविण्याबाबत विचार करून निर्णय घेऊ, असं मी म्हटलं होतं. एवढ्या घाईने त्यांनी निर्णय घ्यायला नको होता, अशी खंत शहाजीबापूंनी पाटील (Shahaji Patil) व्यक्त केली.

Dr. Babasaheb Deshmukh-Shahaji Patil-Deepak Salunkhe
Madha Politic's : माढ्यात उलटफेर, 'काकांच्या भूमिकेशी संपूर्ण सावंत परिवार सहमत नाही'; अनिल सावंतांनी भूमिका केली स्पष्ट

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकला नाही. त्यात माझी अडीच वर्षे झाली. मला पाच वर्षांचा नव्हे; तर अडीच वर्षांचा आमदार म्हणा. गुवाहाटीला गेलो आणि त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या माध्यमातून सांगोल्याच्या समस्या सुटायला लागल्या. पण याच मैदानात मला माजी मुख्यमंत्र्यांनी शिव्या दिल्या. गेली चाळीस वर्षे माझा लढा सुरू आहे.

मी गुवाहाटीला गेलो नसतो, तर माझ्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळाले नसते, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झाले नसते. उद्धवसाहेब, माझा सोसायचा स्वभाव नाही. पण मी तुमचं लय सोसलं आहे. केवळ तुम्ही हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहात म्हणून आम्ही तुमचं सोसतोय. मला शिव्या देऊन काय उपयोग. सांगोल्याचा लय कळवळा होता, तर तालुक्याचे प्रश्नावर बोलायचे ना. पण, तुम्ही हवेतील गप्पा मारून गेलात, त्याने पोटाचा प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Dr. Babasaheb Deshmukh-Shahaji Patil-Deepak Salunkhe
Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; ‘मी शर्यतीत...’

शहाजी पाटील म्हणाले, विधानसभेची लढाई ही माझ्या एकट्याची नाही, तर एकनाथ शिंदेंचीही आहे. माजी मुख्यमंत्री म्हणाले पंधराशे रुपयांत भागतं का. तुम्हाला मुंबईत राहून दीड हजार रुपयांचे महत्व काय कळणार आहे. पण, माझी इभ्रत तुमच्या (जनतेला उद्देशून) हातात आहे. काय झाडी काय डोंगरमुळे देशात गेलेले आपले नाव घालवू नका. गणपतराव देशमुखांच्या विरोधात लढाई खेळून आपण जिंकलो आहोत, हा आपला इतिहास आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com