Dussehra Melava 2025 : भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला नेतेमंडळींनी मोठी गर्दी केली होती. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आयोजित होणाऱ्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा गुरुवारी भगवान गडावर उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपिठावर माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, माजी खासदार प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांची गर्दी झाली होती.
यंदाच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या व्यासपीठावर ओबीसी नेत्यांनी विक्रमी गर्दी केली. यावेळी गोपीनाथगडावर होणारा हा मेळावा आता केवळ मुंडे समर्थकांचा न राहता, ओबीसी समाजाचे मोठे शक्तीप्रदर्शन ठरले आहे. राज्यातील ओबीसी नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून पंकजा मुंडे राजकीय ताकद दाखवून दिली असल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
यावेळी माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev jankar) यांनी उपस्थित जनसमुदायला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भगिनी म्हणून पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून महादेव जानकर हे मेळाव्याला हजेरी लावत आहेत.
यावेळी मार्गदर्शन करताना धनंजय मुंडेंनी यावेळी मी मराठा आरक्षण चळवळीतही होतो आणि ओबीसी आरक्षणासाठी मी प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. या ताटातले काढून त्या ताटात वाढू नका, असा सल्ला त्यांनी ओबीसी आरक्षाणावरून राज्य सरकारला दिला आहे.
त्यासोबत या दसरा मेळाव्यास उपस्थित राहून ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी सूचक संदेश दिला आहे. त्यामुळे येत्या काळात ही सर्व नेतेमंडळी ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.