Mumbai News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर हाती घेतली असल्याची चर्चा रंगली आहे. चारच दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी ठाकरे सेनेच्या काही खासदारांची भेट घेतली असल्याची चर्चा बाहेर आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत संजय राऊत यांच्या घरी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची एक बैठक पार पडली. यावेळी खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात नाराजीचा सूर काढला. त्यानंतर ही नाराजी दूर करण्यासाठी रविवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक बोलवण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.
ठाकरे सेनेच्या नाराज असलेल्या खासदारांची समजूत काढण्यासाठी आणि ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्री येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार व नाराज असलेल्या खासदारांची कशा प्रकारे समजूत काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी दुपारी मातोश्रीवर बोलावलेल्या या बैठकीला खासदार अनिल देसाई, संजय राऊत (Sanjay Raut), प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह ठाकरे यांच्या सेनेचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. एकीकडे दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु असताना ही बैठक घेतली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहेत खासदारांच्या तक्रारीः
उद्धव ठाकरे खासदारांना भेटत नाहीत. त्यासोबतच नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खासदार मंडळींना मदत केली नाही. उद्धव ठाकरे यांनी यावेळी प्रचारही केला नाही. त्याशिवाय युवा नेते आदित्य ठाकरे सुद्धा महाराष्ट्रात फिरले नाहीत, अशा तक्रारींचा पाढा खासदारांनी वाचला आहे. त्यामुळे यावर बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.
त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पड्ल्यानंतर उद्धव ठाकरेंचा संपर्क नसल्यामुळे खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीतील संजय राऊत यांच्या घरी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे विरोधात नाराजीचा सूर काढल्यानंतर ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.