

Sanjay Shirsat: महापालिकेत स्वबळावर नव्वदहून अधिक जागा लढवून जेमतेम तेरा नगरसवेक निवडून आल्यानंतर आता शिवसेनेने मिशन झेडपीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेतील या अपयशावर चिंतन करण्यास सध्या पक्षाकडे वेळ नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर यावर स्वतंत्रपणे बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात भाष्य केले.
जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महापालिकेच्या अपयशाच्या कारणांवर चिंतन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. महापालिका निवडणूकीत पिछेहाट का झाली? याचा लेखी अहवाल मागवण्यात आला असल्याचे शिरसाट यांनी सांगितले. तसेच शक्य होईल तिथे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत युती करण्याच्या सुचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत. यावर त्या त्या जिल्ह्यातील संबंधित आमदार, प्रमुख पदाधिकारी याबद्दल भुमिका घेतील. त्यानंतर युती संदर्भात भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत एकनाथ शिंदे यांनी रविवारी शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे, संजना जाधव, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे बैठकीला हजर हते. यावेळी बैठकीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भाने चर्चा झाली. महापालिकेतील निवडणुकीतील जय पराजयावर मुद्देनिहाय चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होणार असून त्याचा लेखी अहवाल मागवण्यात आला आहे.
नुकतीच आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार संजना जाधव यांनीही याविषयावर चर्चा केली. तर आमदार विलास भुमरे यांनीही पैठणसह छत्रपती संभाजीनगर तालुक्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे. आता महापालिकेची सूत्रं सांभाळणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडेच झेडपीची जबाबदारी दिली जाते की, मग खासदार संदीपान भुमरेंवर ती दिली जाईल? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संभाजीनगरमध्ये महायुतीचा महापौर होईल, त्यात कोणतीही अडचण येईल असे मला वाटत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आमदारांना, जिल्हाप्रमुखांना विचारून आज निर्णय घेण्याचा आमचा माणस आहे. एकनाथ शिंदे साहेब यांनी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी युती करण्याच्या स्पष्ट सुचना दिल्या असून मी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री अतुल सावे यांच्यासोबत बोललो आहे. आजच्या दिवसात या सगळ्या घडामोडी होतील, असे शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.