Vijay Wadettiwar, Bhaskar Jadhav Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti government: महायुती सरकारच्या कारभारावर विरोधकांचा हल्लाबोल; शेतकरी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून घेरले

farmers issues Maharashtra News : नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा रविवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली.

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा रविवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर महाविकास आघाडी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी, भ्रष्टाचार आणि महिलांवरील अत्याचारांसह विविध मुद्यांवर विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अंतिम आठवड्यातील ठरावाद्वारे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्नच सुटले नाहीत, असे म्हणत काँग्रेसचे नेते व माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. विशेषतः त्यांनी कमी दिवसाच्या अधिवशेनावरून टीका केली

राज्यातील सर्वच प्रश्न सुटल्याचा अविर्भावात हे अधिवेशन घेण्यात आले आहे. समारोपवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र, केवळ घोषणा केल्याने जनतेचे सर्वच प्रश्न सुटणार नाही तर त्याची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते याचा विसर महायुती सरकारला पडला आहे. या अधिवेशनकाळात एक दिवस देखील विदर्भातील जनतेच्या प्रशांवर चर्चा झाली नाही. त्यामुळे चर्चा घेण्याचा विसर राज्य सरकारला पडला असल्याची बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.

अधिवेशन काळात राज्य सरकारने केवळ वांझोटी चर्चा केली आहे. राज्यातील शेतकरी वर्गाचे अतिवृष्टीने मोठं नुकसान झाले आहे. त्यावर कसलीच चर्चा केली नाही. केवळ इतर विषयावरच अधिवेशनातील अधिक काळ वाया गेला अशी टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT