Congress Politics : आणखी एका राज्यात काँग्रेसची सत्ता पक्की? ‘या’ निवडणुकीत भाजपसह विरोधकांना दिला झटका

Kerala local body election results : राज्यात काँग्रेसला मोठा विजय मिळाल्यानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. हा एक निर्णायक आणि उत्साह वाढविणारा जनादेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Rahul Gandhi, Congress
Rahul Gandhi Congress Sarkarnama
Published on
Updated on

Congress confidence boost : बिहारमधील विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक पराभवनातून काँग्रेस नेते अजूनही सावरले नाहीत. त्यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भाजप नेत्यांनी काँग्रेसला वारंवार डिवचले. पण आता काँग्रेसला जणू नवसंजीवनी मिळणारी बातमी आहे. आणखी एका राज्यात आपली सत्ता आता पक्की झाल्याचा विश्वास पक्षाच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्याआधी या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. कालच या निवडणुकांचे निकाल हाती आले. या निकालामध्ये काँग्रेसने भाजपसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या सत्ताधारी डाव्यांपेक्षा वरचढ कामगिरी केली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसचा विजय मोठा मानला जात आहे.

केरळमध्ये सहा महापालिका, १४ जिल्हा परिषदा, ८७ नगपालिका, १५२ पंचायत समित्या आणि ९५१ ग्रामपंचायतींसाठी ९ व ११ डिसेबर असे दोन टप्प्यांत मतदान झाले होते. शनिवारी मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने सीपीआय (एम) च्या नेतृत्वाखाली एलडीएफ आघडीचा पराभव केला आहे.

Rahul Gandhi, Congress
CM Devendra Fadnavis : कर्जमाफीबाबत CM फडणवीसांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती; फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही...

यूडीएफला सहापैकी चार महापालिकांध्ये मोठा विजय मिळाला आहे. तर ७ जिल्हा परिशदा, ५४ नगरपालिका, ७९ पंचायत समित्या आणि ५०५ ग्रामपंचायतींवर यूडीएफचा झेंडा फडकला आहे. चार महापालिकांमध्ये कोच्ची, कोल्लम, त्रिशूर आणि कन्नूरचा समावेश आहे. एलडीएफला एक आणि एनडीएला एक महापालिका मिळाली आहे. एलडीएफने २०२० च्या निवडणुकीत पाच महापालिकांमध्ये विजयी पताका फडकावली होती. यावेळी केवळ कोझिकोडमध्ये विजय मिळाला आहे.

भाजपने तिरूवनंतपुरमध्ये विजय मिळवत इतिहास घडवला आहे. याठिकाणी १०१ पैकी ५० ठिकाणी भाजपचा विजय झाला आहे. मात्र, त्यांच्या राज्यातील एकमेव खासदार व केंद्रीय मंत्री असलेल्या सुरेश गोपी यांच्या त्रिशूरमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिरुवनंतपुरमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचे आभार मानले. तसेच केरळची जनता यूडीएफ आणि एलडीएफला वैतागली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi, Congress
महिला आमदार कुस्तीच्या आखाड्यात; आधी भाजपच्या उमेदवाराचा पराभव, आता नवं टार्गेट...

काँग्रेसचा मोठा विजय

राज्यात काँग्रेसला मोठा विजय मिळाल्यानंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. हा एक निर्णायक आणि उत्साह वाढविणारा जनादेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे निकाल यूडीएफवर वाढत असलेल्या विश्वासाचे स्पष्ट संकेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या विजयाचा मार्ग स्पष्टपणे दिसत असल्याचा विश्वासही राहुल यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांचे हे विधान अत्यंत बोलके असेच आहे.

दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, बिहार या राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. दिल्लीत तर पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. महाराष्ट्र आणि बिहारमध्येही वाताहात झाली. पुढील वर्षी देशात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तमिळनाडू वगळात इतर तीन राज्यांत काँग्रेसची सत्ता नाही. बंगालमध्ये एकही आमदार नाही. आसाममधील स्थितीही फारशी चांगली नाही. त्यामुळे पक्षाला केरळमधूनच सर्वात मोठी अपेक्षा आहे. स्थानिच्या निवडणुकीत मतदारांनी पक्षावर दाखविलेला विश्वास आता काँग्रेसची संजीवनी ठरणार आहे. राज्यात सत्ता पक्की झाल्याचा विश्वास नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com