INd-Pak Sarkarnama
महाराष्ट्र

Pahalgam attack : तुमच्या 'त्या' वेळच्या भावना खोट्या; पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळेंच्या मुलीची प्रतिक्रिया

Santosh Jagdale daughter reaction News : पाकिस्तानने नुकत्याच पहलगामवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण केट टीका केली आहे. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया कप 2025 चा सामना रविवारी होत आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार असला तरी या विरोधात देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे भारतातील वातावरण चांगलेच तापले आहे. या वरून आता उलटसुलट प्रतिक्रिया येत असतानाच काही जणांनी पाकिस्तानने नुकत्याच पहलगामवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण केट टीका केली आहे. तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या मुलीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

रविवारी होत असलेला भारत आणि पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. त्यामुळे देशभरातील वातावरण तापले आहे. क्रिकेटप्रेमींपासून ते विरोधकापर्यंत सर्वांनी सरकारला पहलगाम हल्ल्याची आठवण करून देत सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने रविवारी होत असलेल्या सामन्याविरोधात माझं कुंकू, माझा देश हे आंदोलन सुरु केले आहे.

या सामन्यावरून पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी यांनी आज होणारा भारत आणि पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, ‘आजचा सामना आमच्या भावनांशी खेळ आहे. या लोकांमध्ये भावना नाहीत, तिच लोक हे सगळं करतायेत. BCCI ने नव्हते करायला हवं. कारण अजून सहा महिनेसुद्धा झालेले नाहीत 22 एप्रिलला (पहलगाम हल्ल्याला) आणि तुम्ही पाकिस्तानसोबत ज्या देशाचे दहशतवादी येऊन आपल्या लोकांना येऊन मारून जातात, ज्या देशासोबत आपलं इतक्या वर्षांपासून वैर आहे, आपले कितीतरी जवान, सामान्य लोक इतक्या वर्षात दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. तरी सुद्धा तुम्ही त्या देशाच्या सामना खेळता.’

कुठल्याही प्रकारचे सामने खेळू नका

‘आपल्या देशात यायचे नाही आणि आपण त्यांच्या देशात जायचे नाही म्हणून तुम्ही सामना दुबईला ठेवता. तुम्ही त्यांच्याशी कोणत्या मार्गाने डील करताय? अप्रत्यक्षपणे तुम्ही त्यांना फंड देताय दहशतवाद वाढवण्यासाठी. फक्त टीटी साइन करुन किंवा पाणी बंद करुन किंवा ट्रेड बंद करुन तुम्ही त्यांच्याशी संबंध तोडले असे नाही. जर तुम्हाला खरच त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे जे लोक शहीद झाले, त्यांच्या परिवारांबद्दल सहानुभूती असेल तर तुम्ही त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचे सामने खेळू नका. आजची ही मॅच होऊ नये अशी आसावरी जगदाळे यांची इच्छा आहे.

दहशतवादाला पाठिंबा देऊ नका

त्या हल्ल्यानंतर आपल्या देशाने खूप चांगले काम केले आहे, आपल्या सैनिकांनी खूप चांगले काम केले. त्या 26 लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले आहे? तर मग हे काय आहे? जर तुम्ही आजची मॅच पाहिलीत तर तुम्हाला ज्या भावना त्यावेळेला होत्या त्या खोट्या होत्या. तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तुमच्या घरातलं कोणी गेलेले नाहीये किंवा तुमच्या जवळचे कोणी गेले नाहीये. कृपया हे करू नका. हे एक प्रकारे तुम्ही दहशतवादाला पाठिंबा देताय असाच त्याचा अर्थ होतोय, अशी प्रतिक्रिया आसावरी जगदाळे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT