sarkarnama
महाराष्ट्र

Pahalgam Attack Maharashtra Tourists : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर फडणवीस अन् शिंदेंनी दिली महाराष्ट्रातील पर्यटकांबाबत अपडेट!

Statements from CM Fadnavis and Eknath Shinde : जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री?

Mayur Ratnaparkhe

Latest update on Pahalgam terrorist attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्याच्या त्यांन तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. शिवाय, महाराष्ट्रातील पर्यटकांबाबतही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ;;कुठंतरी जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते आहे. मोठ्याप्रमाणात पर्यटक तिथे चालले आहेत. हे सहन न झाल्याने करण्यात आलेला हा हल्ला आहे. पण यामुळे जम्मू-काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही. अशा ज्या नालायक शक्ती आहेत, त्यांचा मुकाबला भारताला करता येतो.''

तसेच ''पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दांत याची निंदा करत दखल घेतलेली आहे. गृहमंत्री देखील तिथे पोहचत आहेत. मी स्वत: तिथे पूर्णपणे संपर्कात आहे. आता जी यादी आमच्याकडे आलेली आहे, त्यात महाराष्ट्रातील दोनजण मृत्युमुखी पडलेली आहेत, काहीजण जखमी देखील आहेत. जी काही तिथे मदत आहे ती तेथील प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत.पण कुठल्याही परिस्थितीत अशाप्रकारच्या ज्या शक्ती आहेत, या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही. असा आम्हाला विश्वास आहे.'' असं फडणवीसांनी सांगितलं

याशिवाय, ''या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. ज्याप्रकारे हा हल्ला झाला हा अतिशय निंदनीय आहे आणि नाव विचारून मारणे हे अत्यंत चुकीचं काम झालं आहे. जम्मू-काश्मीरची जी विकासयात्रा आहे, त्या विकासयात्रेला रोखण्याचं काम केलं गेलं आहे. पण आम्ही सांगू इच्छितो की, ना जम्मू-काश्मीर थांबेल, ना भारत थांबेल. अशा शक्तींना चिरडणं हे भारताला माहीत आहे.'' असंही फडणवीस म्हणाले.

याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले, ''महाराष्ट्रातील पर्यटक आहेत. मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो. तिने मला सांगितलं. माझ्या समोर माझ्या वडिलांना आणि काकांना नाव विचारलं आणि गोळ्या घातल्या. अशाप्रकारचा भ्याड हल्ला केला ते घाबरलेले भेदरलेले अवस्थेत होते. मी त्यांना सांगितलं की, केंद्र सरकार, स्वत: गृहमंत्री तिथे पोहचत आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीनेही संपर्क सुरू आहे.''

तसेच ''पाकड्यांचा बदला.. अॅक्शनला रिअॅक्शन मिळेल. याला करारा जबाब मिळेल. कारण, हा भारत देश आहे आणि या भारत देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे या पाकिस्तानला, पाकड्याला सोडणार नाहीत आणि ज्यांचा निष्पापांचा जीव गेला आहे, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाहीत.''

या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. पर्यटकांवर पहलगाममधील बैतारनच्या जंगलात गोळीबार झाला. टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT