Eknath Shinde, Shambhuraj Desai
Eknath Shinde, Shambhuraj Desai sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे १६१ सदस्य, १८ सरपंच बिनविरोध... शंभूराज देसाई

Umesh Bambare-Patil

पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील ९० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीपैकी १६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका बिनविरोध झाल्या आहेत. त्यातील १३ ग्रामपंचायतींत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा फडकला आहे. पाच ग्रामपंचायतींत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मिळून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तब्बल १६१ सदस्य आणि १८ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

दौलतनगर (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात पाटण विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानत बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व नवनिर्वाचित सदस्याच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व युवा नेते यशराज(दादा) देसाई, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, बबनराव शिंदे, विजय पवार, प्रदिप पाटील, राजाराम पाटील, भरत साळूंखे, विजय पवार, विजय शिंदे उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये मोठया संख्येने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले.बिनविरोध झालेल्या 16 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीमध्ये आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची सत्ता आली. ग्रामस्थांनी विकास कामांकडे बघूनच ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये आपला निर्णय घेतला पाहिजे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालील सरकारमध्ये सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना सातारा जिल्हयासह आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी नेहमीच झुकते माप दिले आहे. सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांत रस्ते, पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

शहाजी बापू म्हणाले, मी खुप नशिबवान आहे, कारण मला शंभूराज देसाई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पाटण तालुक्याला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा असून पाटण तालुका महाराष्ट्राच्या नकाशावर नेण्याचे काम लोकनेते यांनी केले.त्यांचा वारसा आज शंभूराज देसाई हे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री व पालकमंत्री म्हणून समर्थपणे पार पाडत असल्याचा अभिमान वाटतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT