Kolhapur News : राज्यातील कारागृहमध्ये सन 2023 ते 2025 या वर्षांमध्ये रेशन, कॅंन्टीन व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये जवळपास 500 कोटी रूपयाहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यावर हा घोटाळा झाला नसल्याचा व माझ्या काळातील खरेदी नसल्याचे स्पष्टीकरण तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी हे धांदात खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
गुप्ता हे डिसेंबर 2022 ते जुलै 2024 या काळात अप्पर पोलिस महासंचालक कारागृह विभाग पुणे येथे कार्यरत होते. अमिताभ गुप्ता यांच्याच काळात कारागृहात अनेक उपकरणांची खरेदी झाली असून त्यामधील घोटाळ्याची चौकशी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली आहे.
राज्यातील कारागृहातील घोटाळ्याबाबत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर तत्कालीन अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता माझ्या काळातील खरेदी झाले नसल्याचे तर पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी शासनाच्या नियमानुसार खरेदी झाले असल्याचा खुलासा केला. दोन्ही अधिका-यांनी सारवासारव केली असून याबाबत सर्व पुराव्यानिशी माहिती पत्रकार परिषदेत दिली असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या काळात अनेक उपकरणे खरेदी केली आहेत.
ही खरेदी जीएमवरून करत असताना त्या वस्तूंचा त्यावेळचा बाजारातील दर व कारागृह विभागाने खरेदी केलेले दरामध्ये मोठी तफावत आहे. 30 केव्ही जनरेटरची बाजारातील किंमत 5 लाख 40 हजार असताना कारागृहने 9 लाख 90 हजार रूपयास खरेदी केली आहे. एचपीचे लेसर प्रिंटर 30 हजाराची बाजारात किंमत असून 49 हजार 220 रुपयांनी खरेदी केली आहे. अमिताभ गुप्ता यांनीच काही मर्जीतल्या ठेकेदारांमार्फत खरेदी करता यावा याकरिता 27 मार्च 2024 रोजी केंद्रीय पध्दतीने निवीदा करण्याची मागणी शासनाकडे मागणी केली होती.
यामुळे या भ्रष्ट्राचाराची चौकशी सखोल होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तातडीने चौकशी समिती नेमण्याची गरज असून याबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री, मुख्य सचिव व गृह सचिव यांना भेटून सदरची चौकशी समिती नेमण्याची मागणी करणार आहे. जर खरोखरच कारागृह विभागात भ्रष्ट्राचार झाला नसेल तर दोन्ही अधिकारी जी वेळ देतील तेंव्हा माध्यमांच्यासमोर त्यावेळचे कारागृह खरेदी केलेले दर व त्या वस्तुंचे त्याकाळातील बाजारातील दरपत्रक पुन्हा एकदा सादर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.