NCP SP : 'सह्याद्री'त पवारांचा शिलेदार एकाकी; पृथ्वीराज चव्हाण देणार भाजप आमदाराची साथ?

Manoj Ghorpde : भाजप आमदार आमदार मनोज घोरपडे यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Balasaheb Patil, Manoj Ghorpade
Balasaheb Patil, Manoj GhorpadeSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Patil News

कराड : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना घरी बसवण्यासाठीचे जोरदार नियोजन सुरू आहे. या नियोजनात भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन लढविणार असल्याचे जवळपास अंतिम झाले आहे.

भाजप आमदार आमदार मनोज घोरपडे यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतर "ज्या दिवशी सह्याद्री कारखान्याचा निकाल लागेल, त्यादिवशी चव्हाण यांनी मला काही शब्द दिला होता की नाही, हे लक्षात येईल", असे सूचक वक्तव्य घोरपडे यांनी केले.

Balasaheb Patil, Manoj Ghorpade
NCP Politics : रोहित पवार सत्तेच्या वाटेवर, शरद पवारांची सोडणार साथ? अजितदादांच्या विश्वासू शिलेदाराचा मोठा दावा

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी घोरपडे यांची साथ दिल्यास अध्यक्षपदासाठी एकास एक लढत होण्याची शक्यता आहे. चव्हाण यांना मानणारा सभासद अधिक असल्याने याचा थेट फायदा घोरपडेंच्या नेतृत्वातील पॅनेलला होऊ शकतो. यामुळे या निवडणुकीत शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब पाटील एकाकी पडलेले दिसत आहेत.

आमदार घोरपडे म्हणाले, "सत्ताधाऱ्यांकडून आजपर्यंत सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. कारखान्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. कारखाना सभासदांचा राहिला नाही. एकाधिकारशाही विरोधात शेतकरी सभासदांत रोष आहे. या वेळी सह्याद्रीत सभासद परिवर्तन घडवून विद्यमान अध्यक्षांना घरी बसवतील. कारखान्याचा अध्यक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांतून निवडण्याचा सभासदांनी संकल्प केला आहे.

Balasaheb Patil, Manoj Ghorpade
Sharad Pawar NCP: शरद पवार पुन्हा मैदानात; फडणवीस सरकारला आपली ताकद दाखवणार; घेतला 'हा' मोठा निर्णय

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या चर्चेबाबत ते म्हणाले, "भाजप (BJP), काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वांनी एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना मानणारे सभासद अधिक आहेत. त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली. सह्याद्रीचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पाच तालुक्यांत नियोजन केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी काही शब्द दिलाय का? यावर ते म्हणाले, "ज्या दिवशी निकाल लागेल, त्या वेळी लक्षात येईल. आम्ही सगळे सोबत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com