K. P. Patil-A. Y. Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Radhanagri constituency : नाव कृष्ण अन कृत्य शकुनीमामाचे; के. पी. पाटलांवर टीका करत ए. वाय. पाटलांची बंडखोरी

A. Y. Patil Vs K. P. Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ए. वाय. पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 27 October : राधानगरी विधानसभा मतदारसंघात अखेर बंडखोरीची लागण झाली आहे. ए वाय. पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली असताना माजी आमदार के. पी. पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली. ऐनवेळी माझी उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र, राधानगरी विधानसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवणारच. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. नाव कृष्णा असले तरी काम शकुनीमामाचं आहे, अशी टीका करत ए. वाय. पाटील यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे.

राधानगरी मतदारसंघातून (Radhanagri constituency) अपक्ष म्हणून मी निवडणूक अर्ज भरणार आहे, अशी घोषणा ए. वाय. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे राधानगरी मतदासंघात तिरंगी लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता मतदारसंघात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे केपी विरुद्ध ए. वाय पुन्हा लढत पाहायला मिळणार आहे. ए. वाय. पाटील हे उद्या उमेदवारी अर्ज भरणर आहेत.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही. माझी लढाई महायुतीचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात असेल. माझी लढाई महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी नाही. माझ्या उमेदवारीत आडवे आले. नाव कृष्णा असलं तरी काम शकुनीमामाचं, अशी टीका माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव न घेता केली.

राधानगरी तालुक्याला कधीही उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे तालुक्यातील जनता हे आता खपवून घेणार नाही. राधानगरी-भुदरगड मतदार संघाचा 2024 चा आमदार हा ए. वाय. पाटील असतील. उमेदवारीसाठी खोके दिले असतील, मला त्याची कल्पना नाही.

सांगली पॅटर्न संपूर्ण राज्यात पहायला मिळेल, मी अपक्ष आमदार म्हणून निवडून येईन. शब्द दिला असताना मला उमेदवारी का नाकारली हे मी सतेज पाटील यांना जाऊन विचारणार आहे, असा इशाराही ए. वाय. पाटील यांनी दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT