Satara : खासदार उदयनराजे भोसले यांना प्रत्येक निवडणुकीला विरोध करणारे 'बिग बाॅस' फेम अभिजित बिचुकले हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील पोवई नाक्यावर अभिजित बिचुकले यांनी मोठा बॅनर लावला आहे. हा बॅनर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
महाराष्ट्र माझा फॅन आहे आणि मी मोदी (Narendra Modi) साहेबांचा फॅन आहे. मोदीसाहेबांचा एक बॅनर आला होता. ज्यामध्ये छोट्या बालरुपातील श्रीरामांना मोदी बोटाला धरून अयोध्येत चाललेत, असे प्रभू रामांना हाताला धरून नेणे मोदींची मोठी चूक असल्याचे बिचकुलेंनी म्हटले आहे. प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे आहेत. ते एका जाती-धर्माचे नाहीत, असे देखील बिचुकले म्हणाले.
मी नेहमी प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण आणि माझ्या आई-वडिलांचा भक्त आहे. म्हणून तशा पद्धतीने मी बॅनर लावलेला आहे. श्रीरामांचं स्वागत होतंय चांगली गोष्ट आहे. पण मंदिर अपूर्णावस्थेत असताना प्रभू रामाला आणणं कितपत योग्य आहे. हे जर पाप असेल तर हे पाप मोदींच्या मस्तकी जाईल. प्रभू श्रीरामाचं आम्ही स्वागत करतोय. त्याच पुण्य आम्हाला मिळेल, असेदेखील बिचुकले यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिजित बिचुकले हे सातारा नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होते. पण गेली काही वर्षं ते राजकारणात नशीब आजमावत असून 2004 पासून ते अनेक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसले आहेत. पण आजपर्यंत एकही निवडणूक ते जिंकलेले नाहीत. भावी मुख्यमंत्री, भावी राष्ट्रपती हे त्यांचे बॅनर मोठे चर्चेचे विषय ठरलेले होते. बिचुकलेंनी वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आणि कसबा (पुणे) येथूनही पोटनिवडणूक लढवली, तेथे त्यांना अवघी 4 मते मिळाली होती, तर कडेगाव-पलूस मतदारसंघातून विश्वजित कदम यांच्या विरोधातही अर्ज भरला होता.
(Edited By Rohan More)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.