Bhalke-Avtade Group Activist entered NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha Politics : अभिजित पाटील लागले कामाला; भालके-आवताडेंच्या कार्यकर्त्यांना लावले गळाला...

Abhijeet Patil News : सुरुवातीच्या टप्प्यात अभिजित पाटील यांनी पंढरपुरातील आपली राजकीय बांधणी मजबूत केल्यानंतर ते आता मंगळवेढ्याकडे वळले आहेत.

हुकूम मुलाणी

Mangalvedha News : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष संघटनेची बांधणी त्यांनी हाती घेतली आहे. मंगळवेढा तालुक्यातील भाजप आमदार समाधान आवताडे आणि भालके गटातील कार्यकर्त्यांना पाटील यांनी गळाला लावले आहे. तालुक्यातील गुंजेगाव येथील या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी आज अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. (NCP News)

राज्य सहकारी बँकेच्या तक्रारीनंतर राजकीयदृष्ट्या शांत असणारे अभिजित पाटील हे पुन्हा एकदा पंढरपूर मंगळवेढ्याच्या मैदानात उतरल्याचे दिसून येते. पंढरपूर तालुक्यात पाटील गट मजबूत केल्यानंतर आता ते मंगळवेढ्याकडे वळले आहेत. मंगळवेढा तालुक्यातील भगीरथ भालके आणि आमदार समाधान आवताडे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी गळाला लावल्याचे दिसून येत आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!) (Pandharpur-Mangalvedha Politics)

पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर जागा गमवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपुरातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले होते. सुरुवातीच्या टप्प्यात अभिजित पाटील यांनी पंढरपुरातील आपली राजकीय बांधणी मजबूत केल्यानंतर ते आता मंगळवेढ्याकडे वळले आहेत.

गेल्या महिन्यात अभिजित पाटील यांनी शरद पवार यांना धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजी काळुंगे यांच्या कार्यक्रमाला आणून साखर पेरणीला सुरुवात केली होती. त्यानंतर आता ग्रामीण भागातील गुंजेगाव येथील कार्यकर्त्यांनी आज अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे ग्रामीण भागात सध्या अभिजित पाटील यांना बळ मिळत असल्याचे सध्याचे चित्र आहे. (Assembly Election)

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, आंधळगावचे सरपंच लहुजी लेंडवे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, रमेश इंगोले, पांडुरंग कोष्टी, विठ्ठलचे संचालक दशरथ जाधव, हणमंत क्षीरसागर, डाॅ. राजेंद्र यादव, युवा नेते काकासाहेब मोरे, अजिंक्य बेदरे, विठ्ठल ढगे, पप्पू भोसले, राहुल मेटकरी आदी उपस्थित होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT