Baramati Loksabha : सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीबाबत शरद पवार म्हणाले, ‘त्याबाबत तक्रार नाही...’

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितका काळ धनंजय मुंडे यांनी घालवला आहे, त्याहून जास्त काळ डॉ. आव्हाड हे पक्षासाठी कार्यरत आहेत.
Sharad Pawar-Sunetra Pawar
Sharad Pawar-Sunetra PawarSarkarnama

Baramati News : बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील संभाव्य लढतीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज भाष्य केले. प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कुणाच्या उमेदवारीबाबत तक्रार करायचे काही कारण नाही. बारामतीसाठी आम्ही काय केले, हे जनतेला माहिती आहे. आम्ही आमची भूमिका जनतेसमोर मांडू, अशा शब्दांत पवारांनी आपली लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका मांडली. (Baramati Politics)

बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे अजित पवार गटाला प्रत्युत्तर देत आहेत. ते सरळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अंगावर घेत आहेत. शरद पवार गटाची भूमिका ते आक्रमपणे मांडत आहेत. त्यांना अजित पवार गटाकडूनही तेवढ्याच तोडीची उत्तरे दिली जात आहेत.

Sharad Pawar-Sunetra Pawar
Shivsena Maha Adhiveshan : कोल्हापूरच्या अधिवेशनात श्रीकांत शिंदेंची हवाच हवा...

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पवारांमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भांडण लावलं, असा आरोप केला होता. त्या आरोपाचे खुद्द शरद पवार यांनी खंडन केले. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जितका काळ धनंजय मुंडे यांनी घालवला आहे, त्याहून जास्त काळ डॉ. आव्हाड हे पक्षासाठी कार्यरत आहेत. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर त्यांनी काम केले आहे. त्यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, त्यांनी वेगळी भूमिका घेतली असं नाही. जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावं, हे अन्य लोकांनी सांगण्याची आवश्यकता नाही, अशा शब्दांत पवार यांनी मुंडेंना खडसावले. (Sharad Pawar PC)

मला एकटं पाडलं जाईल, या अजित पवार यांच्या आरोपावर शरद म्हणाले, जनतेची सहानुभूती मिळविण्याचा तो प्रयत्न दिसत आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना धमकाविण्याचे फोन येत आहेत. बारामतीत असे प्रकार याआधी कधी घडले नव्हते. ते प्रकार या वेळी बघायला मिळत आहेत.

Sharad Pawar-Sunetra Pawar
Loksabha Election 2024 : मुंबईतील तीन जागांवर काँग्रेसचा दावा; अस्लम शेख लागले तयारीला...

विरोधकांकडून ज्या पद्धतीने भूमिका मांडली जात आहे. ते पाहता त्यांची भाषणे काहीतरी वेगळेच सुचवत आहेत. त्याची नोंद बारामतीचे लोक नक्की घेतील आणि योग्य तो निर्णय घेतील, असेही अजित पवार यांच्या लोकसभेला माझा उमेदवार पडला तर विधानसभेला वेगळा विचार करेन, या विधानावर शरद पवारांनी आपली भूमिका मांडली.

Sharad Pawar-Sunetra Pawar
Sharad Pawar LIVE: बारामतीची जनता कुणाच्या बाजूने ? पवारांनी वाढवले दादांचे टेन्शन | Baramati

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा मार्ग सोडून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विचारविनिमयचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पाहावे. कारण त्यांची प्रकृती उत्तम राहावी, असे आम्हा लोकांना वाटते. हा प्रश्न सुटावा, असे सर्वांना वाटते. लोकांची सहानुभूतीही त्यांना आहे, पण राज्य सरकारनेही समंजसपणाची भूमिका घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी बारामतीत केले.

R

Sharad Pawar-Sunetra Pawar
Sharad Pawar : "कुटुंबातील सर्वजण माझ्याविरोधात", अजित पवारांच्या विधानावर शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com