Indapur Politics : शरद पवारांनी डाव टाकला; इंदापुरात जुन्या सहकाऱ्याला पुन्हा सोबत घेतले...

Jachak-Pawar Meeting : खुद्द पवार हे बारामतीच्या मैदानात उतरल्याने ते कोणते राजकीय डावपेच आखतात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष असणार आहे.
Prithviraj Jachak-Sharad Pawar
Prithviraj Jachak-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Indapur News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. जुन्या सवंगड्यांना पुन्हा सोबत घेण्याचे प्रयत्न पवारांकडून होताना दिसत आहेत. त्यातूनच इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत पवारांनी आज बारामतीत काही काळ चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. (Baramati Loksabha)

राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि त्यांचे सुपुत्र कुणाल जाचक यांनी आज बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीची गणितेही बदलण्याची शक्यता आहे. शरद पवार गट आणि पृथ्वीराज जाचक एकत्र आले तर ‘छत्रपती’सोबतच माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांतही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. (NCP Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prithviraj Jachak-Sharad Pawar
Baramati Loksabha : सुनेत्रा पवारांच्या संभाव्य उमेदवारीबाबत शरद पवार म्हणाले, ‘त्याबाबत तक्रार नाही...’

राष्ट्रवादीतील फुटीनंतर इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले असले तरी तालुक्यात शरद पवारांना मानणारा वर्गही मोठा आहे. याशिवाय सुप्रिया सुळे यांचा संपर्कही इंदापूर तालुक्यात कायम असतो. खुद्द पवार हे बारामतीच्या मैदानात उतरल्याने ते कोणते राजकीय डावपेच आखतात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार मानल्या जातात. त्यांच्या माध्यमातून आव्हान निर्माण झाल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार हे आपल्या जुन्या सहकाऱ्यांना एकत्रित करत आहेत. त्या दृष्टिकोनातूनच आज पृथ्वीराज जाचक यांच्याशी शरद पवार यांनी चर्चा केली. जाचक यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात आहे. त्याचा फायदा सुळे यांना होऊ शकतो. सुप्रिया सुळे यांच्यासाठी पवारांनी गोळाबेरीज सुरू केली आहे.

Prithviraj Jachak-Sharad Pawar
Shivsena Maha Adhiveshan : कोल्हापूरच्या आखाड्यात श्रीकांत शिंदेंची हवाच हवा...

दरम्यान, पृथ्वीराज जाचक यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीपेक्षा छत्रपती कारखान्याची निवडणूक महत्त्वाची आहे. या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक गेल्या चार वर्षांपासून रखडली आहे. शरद पवार व जाचक गट छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आल्यास वेगळे चित्र पाहायला मिळू शकते. कारखान्याच्या निवडणुकीत पवार-जाचक यांचे पारडे जड मानले जात आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ बारामती तालुक्यातील माळेगाव आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांचीही निवडणूक अडीच वर्षांनी होऊ घातली आहे. शरद पवार-जाचक गट छत्रपती कारखान्यात यशस्वी झाल्यास बारामतीतील कारखान्यांतही छत्रपती पॅटर्न येऊ शकतो. त्यामुळेच पवार-जाचक भेटीचे अनेक अंगाने अर्थ लावले जात आहेत. छत्रपती कारखान्याच्या संदर्भात यापूर्वीही शरद पवार आणि जाचक यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर जाचक हे छत्रपती कारखान्याच्या कामात लक्ष घालू लागले होते. मात्र, त्यांचे संचालक मंडळाशी न जमल्याने त्यांनी कारखान्यात जाणे बंद केले होते.

शरद पवार यांच्या भेटीसंदर्भात पृथ्वीराज जाचक म्हणाले, पवारांसोबतची भेट औपचारिक होती. या भेटीत कसल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही.

Edited By : Vijay Dudhale

R

Prithviraj Jachak-Sharad Pawar
Pune Loksabha : धंगेकर फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजप लोकसभेला वापरणार मुळीक अस्त्र?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com