Aditya Thackeray, Shambhuraj Desai, Eknath Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan Shivsena News : शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये आदित्य ठाकरे करणार पोलखोल

Shambhuraj Desai पाटण मतदारसंघात रस्त्यांच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री असताना त्यांनी कोट्यवधीचा निधी दिला होता.

Umesh Bambare-Patil

Patan Shivsena News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पाटण व कराडला शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात ते राज्य सरकारची पोलखोल करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्या संकल्पनेतील 'होऊ द्या चर्चा' या अभियानाची माहिती देण्यासाठी पाटणला Patan Politics आयोजित पत्रकार परिषदेत हर्षद कदम बोलत होते. यावेळी पक्षाचे समन्वय इंद्रजित गुजर, शशिकांत हापसे उपस्थित होते.

कदम म्हणाले, ‘‘पक्षाची ताकद वाढून गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेली विकासकामे आणि गेल्या सव्वा वर्षात रेंगाळलेली विकासकामे याचा लेखाजोखा मतदारांच्या घराघरांपर्यंत पोचवण्यासाठी हे अभियान घेण्यात आले आहे.

त्यासाठी कऱ्हाड, पाटण मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पक्षाने इंद्रजित गुजर यांच्यावर समन्वयाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या माध्यमातून कऱ्हाड पालिका हे पहिले टार्गेट आहे. त्यानंतर पुढच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाईल.

राज्यात आमच्या पक्षाची सत्ता नसतानाही मल्हारपेठ ग्रामपंचायतीत सात कोटींची कामे केली आहेत. त्यामुळे निधी देण्यासाठी लोकप्रतिनिधीच पाहिजेत, असे नाही. सरकारकडून आलेल्या निधीतूनही तुम्ही विकासाची कामे करू शकता, हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे.

मल्हारपेठला खासदार फंडातून १० लाख रुपये चौक सुशोभीकरणासाठी मंजूर झाले. ते काम बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहा महिने रेंगाळत ठेवले. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून १५ लाख रुपये मंजूर झाले. त्याची तिसऱ्या दिवशी वर्क ऑर्डर येते. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्यवेळी उत्तर दिले जाईल.

पाटण मतदारसंघात रस्त्यांच्या कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. आदित्य ठाकरे पर्यटनमंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. ते कुठेही खर्ची झालेले नाही. ते पैसे वळवले गेले आहेत. रस्ता सोडून काहीही कामे झालेली नाहीत. विकासाची अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यावर पुराव्यासह मी बोलणार आहे, असेही ते म्हणाले.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT