Ahmednagar Crime News : दारूमुळे कुठे अन् कधी काय होईल, याचा नेम नाही. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दारूमुळे दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. दारूच्या वादावरून दोन गटांत राडा घडून आला. गावातील अवैध दारू विक्रीवरून ही हाणामारी झाली. विशेष म्हणजे पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटांत जुंपली होती. (Latest Maratha News)
सोमठाणे नलावडे ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत दारूबंदीचा ठराव घेतला. या ठरावावर दारू विक्रेता योगेश मधुकर दौंडे यांनी आक्षेप घेतला. या ठरावावर उपसरपंच आकाश रामा दौंडे यांच्याकडे योगेश दौंडे याने विचारणा केली. यावर उपसरपंच आकाश यांनी ग्रामसभेत ठराव झाल्याचे सांगितले. परंतु योगेश दौंडे याने मी गावात दारू विकणारच, असे म्हणत उपसरपंच आकाश यांना मारहाण केली. या मारहाणीची तक्रार उपसरपंच आकाश यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिली.
उपसरपंच आकाश दौंडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्याची माहिती योगेश दौंडे याला मिळाली. त्याने सतीश दौंडे, संतोष दौंडे, मनोज तुपविहीरे व दोन युवकांना बरोबर घेऊन पाथर्डी पोलिस ठाणे गाठले. उपसरपंच आकाश हे वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस ठाण्यातून बाहेर पडत होते. त्याचवेळी योगेश दौंडे आणि त्याच्या साथीदारांनी उपसरपंच आकाश दौंडे यांच्यावर हल्ला केला. पोलिस ठाण्याच्या आवारात उपसरपंच यांना मारहाण सुरू झाल्याने गोंधळ उडाला. सहायक निरीक्षक योगेश राजगुरू, उपनिरीक्षक सचिन लिमकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत ही हाणामारी सोडवली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले असून, दोघे पळून गेले. पाथर्डी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, उपसरपंच आकाश दौंडे यांचादेखील गुन्ह्यात समावेश केला आहे. या हाणामारीची चर्चा पाथर्डीमध्ये रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.