Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांची इस्लामपुरात एन्ट्री, पण जयंत पाटलांबाबत चुप्पी!

NCP Crisis And Sangli : सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे, हाच हेतू ठेऊन महायुतीत सामील झालो

Anil Kadam

Sangli Political News : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे होमग्राऊंड असलेल्या इस्लामपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले. जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची एन्ट्री होणार असल्याने ते काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते, मात्र त्यांनी जयंतरावांच्या विरोधात जाहीर भाषणात बोलणे टाळले.

एकीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार निवृत्त होत नाहीत, असे जाहीरपणे सांगणारे, राष्ट्रवादीतील इतर नेत्यांचा कडक शब्दात समाचार घेणारे अजित पवार सांगलीत येऊनही जयंत पाटलांबाबत चकार शब्दही काढत नाहीत, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सत्ता येत असते सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे, हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन महायुतीत सामील झाल्याचे सांगित जयंत पाटलांवर वक्तव्य करणे टाळले.

इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार (Ajit Pawar) यांच्याहस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार आम्ही सोडलेला नाही. वाळवा हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. शेवटी जमिनीवर पाय ठेऊनच काम करायचे असते. शेतकरी हिच आमची जात आहे. शेतकऱ्यांच्या पोटीच आम्ही जन्मलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला कळतात. बाजारपेठेला उर्जितावस्था देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. मी राज्याचा अर्थमंत्री आहे, त्यामुळे आपण काळजी करू नका, असा शब्दही अजित पवारांनी दिला.

आम्ही सत्तेला हापापलेली माणसे नाहीत, सत्ता येत असते सत्ता जात असते. सत्तेचा ताम्रपट कोणाकडे नाही. सामान्यांचे काम करायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन महायुतीत सामील झालो. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक म्हणून चांगल्या उमेदवार देणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. विरोधक सैरभैर पळत असल्याचे चित्र आहे. इंडिया आघाडीमध्ये आम्ही एक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून काढता पाय घेतला. अरविंद केजरीवाल यांची भूमिका अजून स्पष्ट नाही. अशा परिस्थितीत इस्लामपूरकर, वाळवाकरांनो आपला देश सव्वा कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा आहे. अनेक जातीचे लोक आहेत. त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, असेही अजित पवार बोलले.

जगामध्ये देशाचे नाव गौरवाने घेतले पाहिजे. आपल्या पंतप्रधानांचा मान सन्मान परदेशात ठेवला जातो. सातत्याने ते जनतेशी संपर्कात असतात. त्यामुळे अमही विचार केला आपण पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडमुठेपणाची भूमिका न घेता आम्ही महायुतीत सहभागी झाले. शेतकऱ्यांचे, गरीब घटक, वयोवृद्ध लोकांचे प्रश्न आम्ही सोडवत आहे. प्रत्येक गावात पक्ष मजबूत असला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचेही अजितदादांनी स्पष्ट केले.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, तालुका अध्यक्ष केदार पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT