Saurabh Rao : पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली, राज्याच्या सहकार आयुक्तपदी वर्णी

IAS Officer Transfer : सौरभ राव, अनिल कवडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Saurabh Rao
Saurabh Rao Sarkarnama
Published on
Updated on

राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ( IAS Officer Transfer ) बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे ( Pune ) विभागीय आयुक्त सौरभ राव ( Saurabh Rao ) यांची बदली करण्यात आली आहे. सौरभ राव यांच्याकडे राज्य सहकार विभागाच्या आयुक्तपदाचा कार्यभार सोपावण्यात आला ( Saurabh Rao Transfer ) आहे. तर, सहकार आयुक्त अनिल कवडे यांची बदली करण्यात आली ( Anil Kawade Transfer ) आहे.

Saurabh Rao
Pune University: पुणे विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक व्हायचयं; अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख

सौरभ राव यांच्याकडे पुणे विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी होती. पण, राव यांची सहकार विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे साखर आयुक्तपदाचा कार्यभार सोपावण्यात आला आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावं

  • अनिल पाटील - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया

    बदली - हाफकिन बायो-फार्मा मुंबई संचालकपदी नियुक्ती

  • डी. के. खिल्लारी - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा

    बदली - मागासर्गीय आणि बहुजन कल्याण विभाग, पुणे संचालकपदी नियुक्ती

  • राहुल गुप्ता - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, धाराशिव

    बदली - छत्रपती संभाजीनगर महावितरण संचालकपदी नियुक्ती

  • मुरुगानंथम.एम - प्रकल्प अधिकारी, ITDP, चंद्रपूर आणि सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर उपविभाग

    बदली - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गोंदिया येथ नियुक्ती

  • यशनी नागराजन - प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहायक जिल्हाधिकारी केळापूर उपविभाग, यवतमाळ

    बदली - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सातारा येथे नियुक्ती

Saurabh Rao
Job Opportunity in RTR : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी; भारतीय रेल्वेत नऊ हजार पदांची भरती !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com